अनुष्का शर्मा करतेय क्रिकेटमध्ये पदार्पण? ब्लू जर्सीत सराव करतानाचे PHOTO VIRAL

अनुष्का शर्मा करतेय क्रिकेटमध्ये पदार्पण? ब्लू जर्सीत सराव करतानाचे PHOTO VIRAL

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा गेल्या वर्षभरात एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही आहे. त्यामुळं अनुष्का शर्माच्या चाहत्यांसाठी ती नक्की काय करतेय, याकडे उत्सुकता लागली आहे.

  • Share this:

कोलकाता, 13 जानेवारी : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा गेल्या वर्षभरात एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही आहे. त्यामुळं अनुष्का शर्माच्या चाहत्यांसाठी ती नक्की काय करतेय, याकडे उत्सुकता लागली आहे. मात्र अनुष्का शर्मा क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर क्रिकेटचा सराव करताना दिसत आहे. त्यामुळं अनुष्का क्रिकेटमध्ये पदापर्ण तर करत नाही आहे ना? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

मात्र अनुष्का शर्मा क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी नाही तर क्रिकेटरची भुमिका करण्यासाठी सराव करत आहे. अनुष्का शर्मा आता मोठ्या पडद्यावर भारतीय महिला संघाची माजी कर्णधार आणि अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीची (Jhulan Goswami) भुमिका साकारणार आहे. भारताची अनुभवी महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी (Jhulan Goswami)जगातील सर्वोत्तम महिला वेगवान गोलंदाज आहे. भारतीय क्रिकेटमध्ये झुलन यांचे वेगळे स्थान आहे. त्यांनी महिलांचे क्रिकेट अगदी जवळून बदलताना पाहिले आहे. दिग्गज खेळाडू आणि तरुण खेळाडूंसहदेखील त्या खेळल्या. त्यामुळं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मोठ्या पडद्यावर झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यासाठी अनुष्कानं कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर सरावही सुरू केला आहे.  झुलनची बायोपिक दिग्दर्शन विवेक कृष्णानी करणार आहेत.

वाचा-आता अनुष्का शर्मा हातात घेणार बॅट, विराटसोबत करणार क्रिकेटचा सराव!

वाचा-अजयच्या ‘तानाजी’ने दीपिकाच्या ‘छपाक’ला दिला धोबीपछाड! तीन दिवसांत तिप्पट कमाई

अनुष्का शर्माचे इडन गार्डनमध्ये सराव करतानाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये अनुष्का झुलन यांच्या सारखे केस बांधून ब्लु जर्सीत मैदानात दिसत आहे. दरम्यान, अनुष्का आणि इतर 10 खेळाडूंसमवेत एक प्रोमो शुट करणार आहे. या सिनेमा कधी रिलीज होणार याबाबत माहिती मिळालेली नाही.

वाचा-ऐश्वर्या राय माझी आई, 32 वर्षीय तरुणाने केला दावा

दरम्यान अनुष्का 2018मध्ये शाहरुख खानसोबत झिरो या सिनेमात शेवटची दिसली होती. त्यानंतर अनुष्काचा एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळं अनुष्काच्या चाहत्यांची नजर आता झुलन गोस्वामी यांच्या बायोपीकवर आहे.

वाचा-‘13 वर्षांची असताना झाला बलात्काराचा प्रयत्न’, बिग बॉस फेम अभिनेत्रीचा खुलासा

कोण आहे झुलन गोस्वामी

37 वर्षीय झुलन यांनी 2002मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्या भारताच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक बनल्या. त्यांनी भारताकडून 10 कसोटी, 182 एकदिवसीय आणि 68 टी -20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 321 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये झुलन यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

वाचा-बॉलिवूडची पहिली स्टंट वुमन, 'शोले' मध्ये हेमा मालिनींसाठी केला होता हा स्टंट

सुपरहिट आहे खेळाडूंची बायोपिक

बॉलिवूडने बर्‍याच खेळाडूंची बायोपिक बनविली आहे, ती उत्तम हिटदेखील ठरली आहे. एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (MS Dhoni: The Untold Story), मेरी कॉम, भाग मिल्खा भाग या सिनेमांनाही चाहत्यांनी पसंती दिली. खरंतर बॉलिवूडमध्ये खेळाडूंवर बायोपिक बनवण्याचा ट्रेंड बनला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: January 13, 2020, 3:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading