Home /News /entertainment /

Anushka Sharma ने सोडलं 'हे' क्षेत्र; भावाच्या हातात दिला सर्व कारभार; काय आहे कारण?

Anushka Sharma ने सोडलं 'हे' क्षेत्र; भावाच्या हातात दिला सर्व कारभार; काय आहे कारण?

चित्रपट निर्मितीमध्येही आघाडीवर असणाऱ्या अनुष्काने आतापर्यंत एनएच 10, परी, फिल्लौरी या चित्रपटांची तर बुलबुल या नेटफ्लिक्सवरील (Netflix Bulbul) सिनेमाची निर्मिती केली आहे. Amazon Prime Video वरील पाताल लोक या गाजलेल्या सीरिजची ती एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 19 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma Latest Update) ही प्रतिथयश चित्रपट निर्मातीदेखील आहे. रब ने बना दी जोडी, बँड बाजा बारात, सुलतान, जब तक है जान, ए दिल है मुश्किल, दिल धडकने दो आणि पीके या चित्रपटांमधल्या तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. अनुष्का शर्मा जशी बॉलिवूडमध्ये (Bollywood) सक्रिय आहे तशीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ आणि फोटोंना चाहत्यांची विशेष पसंती मिळते. तसेच तिच्या पोस्ट फॅन्समध्ये नेहमीच चर्चेत असतात. अनुष्का शर्मा हिने आता निर्मिती क्षेत्र सोडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान चित्रपट निर्मितीमध्येही आघाडीवर असणाऱ्या अनुष्काने आतापर्यंत एनएच 10, परी, फिल्लौरी या चित्रपटांची तर बुलबुल या  नेटफ्लिक्सवरील (Netflix Bulbul) सिनेमाची निर्मिती केली आहे. Amazon Prime Video वरील पाताल लोक या गाजलेल्या सीरिजची ती एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे. परंतु, अनुष्काने आपल्या करिअरच्या या टप्प्यावर नुकतीच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मी आता यापुढे चित्रपटांची किंवा वेबसीरिजची निर्मिती करणार नसल्याचं अनुष्कानं जाहीर केलं आहे. एका प्रदीर्घ पोस्टच्या माध्यमातून तिनं ही माहिती दिली आहे. तिची ही पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे हे वाचा-'छत्रपती' शिवाजी महाराज म्हणणं 'Optional' नाही, चिन्मय मांडलेकरचा Video चर्चेत बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं नुकतीच यापुढे चित्रपटांची निर्मिती न करण्याची घोषणा केली आहे. मी या पुढे केवळ अभिनयावरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचं तिनं म्हटलं आहे. अनुष्काने अशा आशयाची पोस्ट केली आहे की, माझं प्रॉडक्शन हाऊस असलेल्या क्लीन स्लेट फिल्म्समधला (Anushka Sharma Clean Slate Films) माझा प्रवास थांबवत आहे. मी स्थापन केलेल्या या प्रॉडक्शन हाऊसची संपूर्ण जबाबदारी आता माझा भाऊ कर्णेश शर्मा (Karnesh Sharma) सांभाळणार आहे. त्याने आतापर्यंत अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मला आता केवळ अभिनयावरच लक्ष केंद्रीत करायचं आहे. त्यामुळे मी क्लीन स्लेट फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी कर्णेश शर्माकडे सोपवत आहे.'
अनुष्काच्या या पोस्टची सध्या फॅन्समध्ये जोरदार चर्चा आहे. या पुढे ती केवळ अभिनेत्री म्हणूनच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हे यावरून स्पष्ट होते. सीएफएस या आपल्या प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी भाऊ कर्णेशकडे सोपवताना तिनं त्याला आणि सीएसएफच्या संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनुष्काची पुढील वाटचाल आता नेमकी कशी असेल याविषयी फॅन्सच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
First published:

Tags: Anushka sharma

पुढील बातम्या