News18 Lokmat

रिसेप्शननंतर कुठे चाललेत अनुष्का आणि विराट?

आज सकाळी दोघांना दिल्ली विमानतळावर पाहिलं. मग कॅमेरामन गप्प कसे बसतील? लगेच क्लिक्स सुरू झाले.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 22, 2017 04:42 PM IST

रिसेप्शननंतर कुठे चाललेत अनुष्का आणि विराट?

22 डिसेंबर : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं काल रिसेप्शन झालं. मोदीही लग्नाला हजर राहिले होते. आणि आज सकाळी दोघांना दिल्ली विमानतळावर पाहिलं. मग कॅमेरामन गप्प कसे बसतील? लगेच क्लिक्स सुरू झाले.

ब्लॅक टी शर्ट आणि गाॅगलमध्ये विराट हँडसम दिसत होता. तर ट्रॅडिशनल ड्रेसमधली अनुष्का शर्मा सुंदर दिसत होती. ते मुंबईसाठी निघाले होते.

मुंबईत सेंट रेगीसमध्ये 26 डिसेंबरला रिसेप्शन आहे. दिल्लीप्रमाणेच हे रिसेप्शन शानदार होईल यात शंका नाही. यावेळी टीम इंडियाची उपस्थितीही असणारेय. शिवाय बाॅलिवूडच्या हस्तीही येणार आहेत.

Loading...

विराट-अनुष्का वरळीच्या आपल्या नव्या घरी राहायला येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...