• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Paparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल! VIDEO सोशल मीडियावर VIRAL

Paparazzi पासून वाचण्यासाठी विरुष्काने लढवली शक्कल! VIDEO सोशल मीडियावर VIRAL

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat kohali) या सेलिब्रिटी दाम्पत्यानं 11 जानेवारीला मुलगी झाल्याची गूड न्यूज दिली. विरुष्काच्या पहिल्या बाळाचा फोटो मिळवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी अनेक सेलिब्रिटी फोटोग्राफर्स (Paparazzi) विशेष प्रयत्न करताना दिसून आले होते.

 • Share this:
  मुंबई, 14 जानेवारी: अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat kohali) या सेलिब्रिटी दाम्पत्यानं 11 जानेवारीला मुलगी झाल्याची गूड न्यूज दिली. विरुष्काच्या पहिल्या बाळाचं (First Baby Girl) स्वागत करण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. विराटनं त्याच्या सोशल मीडिया (Social Media) हँडल्सद्वारे ही आनंदाची बातमी दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरूष्कावर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती विरूष्काच्या बाळाची एक झलक बघण्याची. दरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat kohali) पालक झाल्यानंतर आपल्या बाळाच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेताना दिसत आहे. बाळाच्या अगदी जन्मानंतर अनुष्का आणि विराटने त्यांच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा, अशी विनंती केली होती. विरूष्काच्या बाळाचा फोटो मिळवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी अनेक सेलिब्रिटी फोटोग्राफर्स (Paparazzi) विशेष प्रयत्न करताना दिसून आले होते. आपल्या बाळाला या Paparazzi च्या कॅमेरात कैद होण्यापासून वाचवण्यासाठी या सेलिब्रिटी कपलने एक शक्कल लढवली आहे. विरूष्काने या Paparazzi ना खुश करण्यासाठी त्यांना काही विशेष गिफ्ट्स पाठवले आहेत. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर विरूष्काने पाठवलेल्या या गिफ्टचा  एक व्हिडीओ शेअर केला आहे.
  सोबतच एक विनंतीपूर्ण  मेसेज  पाठवला आहे कि एक पालक म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की आम्हाला आमच्या बाळाच्या खासगी आयुष्याचे रक्षण करायचे आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची आणि समर्थनाची नितांत गरज आहे. आम्ही योग्यवेळी तुम्हाला माहिती उपलब्ध करुन देऊ अशी हमी या दांपत्याने Paparazzi दिली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: