IPLच्या आधी विराटला चीअर-अप करताना दिसली अनुष्का शर्मा

IPLच्या आधी विराटला चीअर-अप करताना दिसली अनुष्का शर्मा

सिनेमाच्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन अनुष्का सध्या IPLसाठी विराटला चीअर-अप करताना स्पॉट झाली.

  • Share this:

मुंबई, 24 मार्च : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली सध्या देशातलं सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल आहे. सिनेमाच्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन अनुष्का सध्या IPLसाठी विराटला चीअर-अप करताना स्पॉट झाली. विराटकडे बघून असं वाटतंय की, त्याला IPL सामन्यांआधी कोणताही ताण घ्यायचा नाही. त्यामुळे IPL सुरु होण्याआधी विराट आणि अनुष्का सध्या एकत्र वेळ घालवताना दिसले. यावेळचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

IPL-2019च्या निमित्ताने विराट आणि अनुष्का सध्या बेंगलुरुमध्ये आहेत. 23 मार्चला या सीझनमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्याआधी अनुष्काच्या ट्विटर फॅन पेजवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. ज्यात विराट कोहली व्हिडीओ गेम खेलताना दिसत आहे. याशिवाय आरसीबीचे खेळाडू पार्थिव पडेल आणि उमेश यादवही दिसत आहेत. यावेळी अभिनेत्री आमि विराट कोहलीची पत्नी शूटिंगमधून ब्रेक घेऊन विराट सोबत वेळ घालवत आहे. झीरोनंतर आता अनुष्काकडे कोणताही चित्रपट नसला तरी ती विराटसोबत एका जाहीरातीत दिसली.

विराटनं आपल्या ट्विटर हँडलवर ही जाहीरात पोस्ट करत शूटिंगचा अनुभव शेअर केला. या जाहीरातीत अनुष्का आणि विराटमधील जबरदस्त बाँडींग पहायला मिळत आहे. या जाहीरातीत कामात व्यस्त असलेल्या अनुष्कासाठी विराट कॉपी घेऊन येतो. अनुष्का कॉफी पित असताना तो तिला सांभाळून कॉफी पिण्याचा सल्ला देतो.विराटचं प्रेम बघून अनुष्कासुद्धा खूश होते. विराट अनुष्काच्या नात्यातील प्रेम आणि बाँडींग या जाहीरातीत दिसून येतं.

First published: March 24, 2019, 12:11 PM IST

ताज्या बातम्या