• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO: समुद्राच्या मधोमध दिसला विरुष्काचा ‘खुल्लम खुल्ला प्यार’

VIDEO: समुद्राच्या मधोमध दिसला विरुष्काचा ‘खुल्लम खुल्ला प्यार’

विराट आणि अनुष्काने जवळपास चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. एवढंच नाही तर दोघांनी लग्न करण्यार असल्याची गुप्तताही पाळली होती.

 • Share this:
  नवी दिल्ली, १३ मार्च २०१९- आपल्या व्यग्र वेळापत्रकातून एकमेकांसाठी कसा वेळ काढायचा हे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. सोशल मीडियावर दोघंही आपल्या व्हेकेशनचे फोटो अनेकदा शेअर करत असतात. झिरो सिनेमाच्या प्रमोशननंतर अनुष्काला जसा वेळ मिळाला ती विराटला भेटायला ऑस्ट्रेलियात गेली. याचवेळी दोघांनी एकत्र नवीन वर्षाचं स्वागतही केलं. त्यांचे नवीन वर्षाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विराटचा ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर अनुष्का न्युझीलंडमध्येही त्याला भेटायला गेली होती. आता दोघांचां न्युझीलंडमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांची केमिस्ट्री स्पष्ट दिसत आहे.
  काही दिवसांपूर्वी अनुष्काने तिच्या लग्नाशी निगडीत एक मोठा खुलासा केला होता. अनुष्का म्हणाली होती की, तिला हे लग्न अतिशय खासगी ठेवायचं होतं. यामुळेच त्यांनी इटलीला प्राधान्य दिलं. या लग्नाला जवळचे फक्त ४२ लोक उपस्थित होते. लग्नात जे केटरर होते त्यांनाही विराटचं खोटं नाव राहुल सांगण्यात आलं होतं. विराट आणि अनुष्काने जवळपास चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. एवढंच नाही तर दोघांनी लग्न करण्यार असल्याची गुप्तताही पाळली होती. लग्नाच्या काही दिवसआधीच प्रसारमाध्यमांना याबद्दल कळलं होतं. VIDEO : आधी देवीचं दर्शन, पार्थ पवार पोहोचले कार्ला गडावर!
  First published: