Netflix : शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा बॉलिवूडमधून गायब असण्याचं ‘हे’ आहे कारण

Netflix : शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा बॉलिवूडमधून गायब असण्याचं ‘हे’ आहे कारण

अनुष्का आणि शाहरुख 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘झीरो’ या सिनेमात दिसले होते. त्यानंतर दोघांनीही कोणताही सिनेमा साइन केलेला नाही.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा मागच्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडच्या कोणत्याही सिनेमात दिसलेले नाहीत. तसेच कोणताही नवा सिनेमा साइन केलेला ऐकीवात नाही. हे दोघंही शेवटचे 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘झीरो’ या सिनेमात दिसले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर अनुष्का आणि शाहरुख दोघंही कोणत्याही सिनेमाचा भाग बनलेले नाहीत. त्यांमुळे त्याच्या बद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेले हे दोन्ही स्टार आता त्यांच्या नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहेत.

नेटफ्लिक्सनं नुकत्याच त्यांच्या नव्या दोन सीरिजची घोषणा केली आहे. ज्याच्या माध्यमातून शाहरुख आणि अनुष्का शर्मा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे दोघंही नेटफ्लिक्सच्या दोन वेगवेगळ्या प्रोजेक्टशी जोडले गेले आहेत. नेटफ्लिक्सनं दिलेल्या माहितीनुसार शाहरुखची रेड चिली एण्टरटेनमेंट हॉरर वेब सीरिज ‘Betaal’ प्रोड्युस करत आहेत तर अनुष्का आणि कर्नेश शर्मा यांची क्लिन स्लेट फिल्म  Mai  या सीरिज साठी एक्झिक्युटीव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाह आहे. हा अनुष्काचा नेटफ्लिक्ससोबतचा एकत्र दुसरा प्रोडेक्ट आहे. याआधी क्लिन स्लेटनं याआधी बुलबुल ही एक वेबसीरिज प्रोड्यूस केली होती.

कतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा

नव्या वेब सीरिजबाबत बोलताना अनुष्का म्हणाली, ‘आम्ही नेहमीच आमच्या प्रेक्षकांना काहीतरी वेगळं आणि चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी नेटफ्लिक्स हा खूप चांगला पर्याय आहे. यामुळे आम्ही जगातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो.’ Mai  या 47 वर्षांच्या महिलेच्या भोवती फिरते. जी हिसांचारात अडकलेली असते. ही वेब सीरिज अतुल मोंगिया, तामल सेन आणि अमिता व्यास यांनी लिहिली आहे तर सुदिप शर्मा त्याचे क्रिएटीव्ह प्रोड्यूसर आहेत.

...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून!

 

View this post on Instagram

 

#sixyardsof elegance - nothing like playing dress up in our favourite saris. #lmifw @thefdci

A post shared by Mufasa✨🌙 (@masabagupta) on

याशिवाय शाहरुख खान सुद्धा ‘Betaal’ या वेब सीरिजच्या माध्यमातून नेटफ्लिक्स सोबत दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहे. ही वेबसीरिज एका दुर्गम गावावर आधारित आहे. दोन दशकांपूर्वी ब्रिटीश इंडियन आर्मी ऑफिसर आणि त्याची झोंबी बटालियनच्या भेटीची ही कथा आहे. याची कथा सुहानी कुंवर यांनी लिहिली असून निखिल महाजन यांनी या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताची लाइफ स्टोरी सुद्धा नेटफ्लिक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलघडली जाणार आहे. मसाबा ही अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आहे.

मलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं

==========================================================================

कोंबडा भिडला सापला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 05:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading