News18 Lokmat

अनुष्कानं सोशल मीडियावर शेअर केला हनिमूनचा फोटो

लग्नानंतर दोघं रोमला हनिमूनला गेलेत. आणि तिथला फोटो अनुष्कानं इन्स्टाग्रामवर टाकलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 15, 2017 06:53 PM IST

अनुष्कानं सोशल मीडियावर शेअर केला हनिमूनचा फोटो

15 डिसेंबर : विराट-अनुष्काचं शुभमंगल झालं आणि सोशल मीडियावर फोटोज, जोक्स बरेच शेअर झालेत. लग्नानंतर दोघं रोमला हनिमूनला गेलेत. आणि तिथला फोटो अनुष्कानं इन्स्टाग्रामवर टाकलाय. याआधी तिनं विराटसोबतचे फोटो फारसे शेअर केले नव्हते. पण लग्नानंतर ती ही कमी पूर्ण करतेय, असं वाटतं.

In heaven, literally 😇😍

Loading...

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

हा हनिमूनचा फोटो फारच सुंदर आहे. सगळीकडे पांढराशुभ्र बर्फ दिसतोय. आणि फोटोखाली तिनं लिहिलंय, खरोखर, जणू काही मी स्वर्गात आहे.

दोघांचा फोटोही फार सुरेख आहे. फोटोत अनुष्काच्या हातावर मेहंदी आणि अंगठी उठून दिसतेय.

लग्नानंतर अनुष्काचे आई-वडील आणि वऱ्हाडी सगळे मुंबईला परतले. रोमहून दोघं मुंबई आणि दिल्लीला होणाऱ्या रिसेप्शनसाठी परततील. त्यानंतर ते वरळीच्या नव्या घरी राहायला येतील.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 06:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...