ही 'परी' भलतीच भीतिदायक!

अनुष्का शर्मानं आपल्या 'परी' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2017 01:43 PM IST

ही 'परी' भलतीच भीतिदायक!

13 जून : अनुष्का शर्मानं आपल्या 'परी' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज केलाय. सिनेमाचं नाव खूप आकर्षक असलं, तरी पोस्टर भीतिदायक आहे.

निळ्या बॅकग्राऊंडवरचे अनुष्काचे डोळे काही प्रश्न विचारतात. तिच्या चेहऱ्यावरही जखमेची खूण आहे. या पोस्टरवरून तरी हा हाॅरर सिनेमा असल्याचं कळतंय. 'फिलौरी'मध्ये अनुष्का क्युट भूत होती. आता या सिनेमात नक्की काय आहे, याची उत्सुकता आहे.

या सिनेमात अनुष्कासोबत परमब्रता चॅटर्जी आहे. 'कहानी'मध्ये त्याची भूमिका होती. या सिनेमातून प्रोसित राॅय दिग्दर्शनाची इनिंग सुरू करतोय.

सध्या अनुष्का शाहरूखबरोबर 'जब हॅरी मेट सेजल' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2017 01:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...