दक्षिण आफ्रिकेतून अचानक अनुष्का का परतली?

दक्षिण आफ्रिकेतून अचानक अनुष्का का परतली?

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट दौऱ्यावर गेला. तिथले दोघांचे व्हिडिओजही प्रसिद्ध झाले. आणि आता अचानक अनुष्का परतली मुंबईत. का बरं ती परतली असेल?

  • Share this:

08 जानेवारी : गेल्या वर्षीचं गाजलेलं लग्न म्हणजे विराट आणि अनुष्का. दोघांचं लग्न, मग हनिमून आणि दिल्ली-मुंबईतली रिसेप्शन्स सर्व काही चर्चेत होतं. त्यानंतर विराट कोहली दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट दौऱ्यावर गेला. तिथले दोघांचे व्हिडिओजही प्रसिद्ध झाले. आणि आता अचानक अनुष्का परतली मुंबईत. का बरं ती परतली असेल?

अनुष्का परत आलीय ती 'झीरो'च्या शूटिंगसाठी. विराट आणि अनुष्का दोघंही आपापल्या कामाला लागलेत. विराट सध्या दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट खेळतोय. तर अनुष्काच्या शूटिंग डेट्स ठरल्यात.

अनुष्काचं स्वागत झीरोच्या टीमनं मोठं जंगी केलं. तिनं इन्स्टावर लिहिलंय, 'मी झीरोसाठी परत आलीय. इथे आल्यावर माझ्या सहकाऱ्यांनी माझी व्हॅन फुलांनी सजवली. त्याबद्दल धन्यवाद.'

2018मध्ये अनुष्का खूप बिझी आहे. परी, झीरो आणि सुई-धागा हे सिनेमे ती करणारेय. किंग खानसोबत रबने बना दी जोडी, जब तक है जान, जब हॅरी मेट सेजल हे सिनेमे तिनं केलेत.

First published: January 8, 2018, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading