मुंबई, 28 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) स्वत:च्या गरोदरपणाबद्दल ऑगस्टमध्ये माहिती दिली. त्यानंतर ती सोशल मीडियावर बेबी बम्पचे फोटो शेअर करत असते. अनुष्का तिच्या गरोदरपणाचे दिवस मस्त मजेत घालवताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर ती चांगलचीच सक्रीय असते. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने बाळाला जन्म दिल्यानंतर अभिनय क्षेत्रात काम सुरू ठेवणार का या प्रश्नाचा खुलासा केला आहे.
अनुष्काचं बाळ जानेवारी 2021मध्ये जन्माला येणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी अनुष्का पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार आहे. अनुष्का शर्मा बाळ झाल्यानंतर अभिनय क्षेत्रातील कामाबद्दल म्हणाली, ‘मला सेटवर राहण्यामुळेच सर्वात जास्त आनंद मिळतो. आता बाळ झालं की काही महिने मी त्याच्यासोबत वेळ घालवणार आहे. पण त्यानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात करेन.’ अनुष्का शर्मा म्हणते, ‘2020 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अतिशय आर्थिकदृष्ट्या अतिशय नुकसानीचं होतं. पण आता पुन्हा एकदा आर्थिक गणित ताळ्यावर येत आहे. याचा मला आनंद आहे.’
View this post on Instagram
शेवटच्या श्वासापर्यंत काम करायला आवडेल
लग्न झाल्यावर किंवा मुल झाल्यावर अनेक अभिनेत्री करिअरपासून दूर जातात. पण अनुष्का शर्माचा विचार काहीसा वेगळा आहे. ती म्हणते, ‘सेटवर असणं, संवाद म्हणणं किंवा चित्रपटाशी निगडीत एखादं काम केल्याशिवाय मी जगूच शकत नाही. त्यामुळे मला मरेपर्यंत काम करत राहायचं आहे. बाळ झाल्यावर मी माझ्या कामाचं शेड्यूल आणि घराला वेळ देणं या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणार आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Pregnancy, Virat kohli