मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

“तू तर जलपरी दिसतीये” अनुषाच्या Bikini video वर कलाकारही फिदा

“तू तर जलपरी दिसतीये” अनुषाच्या Bikini video वर कलाकारही फिदा

लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओवर मनोरंजनसृष्टीतील अनेक नामांकित अभिनेत्रींनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Anusha Dandekar new bikini video)

लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओवर मनोरंजनसृष्टीतील अनेक नामांकित अभिनेत्रींनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Anusha Dandekar new bikini video)

लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओवर मनोरंजनसृष्टीतील अनेक नामांकित अभिनेत्रींनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Anusha Dandekar new bikini video)

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 31 मे: अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री, होस्ट आणि व्हीजे म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या काही काळात ती टेलिव्हिजन शोंऐवजी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं अधिक चर्चेत राहु लागली आहे. सध्या ती बोल्ड फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. (Anusha Dandekar hot photo) यातच तिच्या आणखी एका नव्या व्हिडीओनं इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओवर मनोरंजनसृष्टीतील अनेक नामांकित अभिनेत्रींनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Anusha Dandekar new bikini video) अनुषानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिनं एक बोल्ड बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. खरं तर तिनं हे शूट एका मॅगझिनसाठी केलं होतं. परंतु त्यामधील एक व्हिडीओ आणि फोटो आधीच शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती स्विमिंग पूलमधून स्लो मोशनमध्ये बाहेर येताना दिसत आहे. तिचा हा हॉट आणि सेक्सी अवतार पाहून इतर अभिनेत्रींनी देखील तिची स्तुती केली आहे. “तू तर जलपरी दिसते आहेस” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत हजारो नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘कोणी काम देता का काम’; दंगल फेम फातिमा कोरोनामुळं झाली बेरोजगार
View this post on Instagram

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

अजय देवगणनं लॉकडाउनमध्ये मुंबईत घेतलं कोट्यवधींचं घर; किंमत ऐकून चक्रावून जाल यापूर्वी देखील अनुषानं असाच एक टॉपलेस प्रकारातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये तिनं केवळ एक जॅकेट परिधान केलं होतं. यामुळं काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल देखील केलं होतं. यापैकी एका महिलेने तर “माझ्याकडे एक्स्ट्रा ब्रा आहे. तू पत्ता सांग, मी तुला ती पाठवून देते.” अशी कमेंट केली होती. यावर तिनं देखील खिलाडूवृत्तीनं उत्तर देत “तुम्ही ती तुमच्याकडेच ठेवा, मी तिच्याविनाच आनंदी आहे. धन्यवाद.” अशी प्रतिक्रिया दिली होती. अनुषाचा हा बोल्ड आणि बिनधास्त अॅटिट्यूड या नव्या व्हिडीओमध्ये देखील पाहायला मिळत आहे.
First published:

Tags: Bold photoshoot, Entertainment, Video viral

पुढील बातम्या