Article 370 : मोदींबद्ल ट्वीट करणं अनुराग कश्यपला पडलं महाग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Article 370 : मोदींबद्ल ट्वीट करणं अनुराग कश्यपला पडलं महाग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

काश्मीरमधलं कलम 370 हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरून देशात दोन गट पडले आहेत. बॉलिवूडमध्येही यावरून दोन गट झालेले पाहायला मिळाले. आता निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी काश्मीरबद्दल केलेल्या ट्वीटवरून वाद निर्माण झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 7 ऑगस्ट : काश्मीरमधलं कलम 370 हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरून देशात दोन गट पडले आहेत. बॉलिवूडमध्येही यावरून दोन गट झालेले पाहायला मिळाले. आता निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपने काश्मीरबद्दल केलेल्या ट्वीटवरून वाद निर्माण झाला आहे.

त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे, 'एका माणसाला असं वाटतं की 120 कोटी जनतेच्या हितासाठी काय करायचं आहे हे फक्त आपल्यालाच कळतं. हे करण्यासाठी त्यांच्याकडे सत्ताही आहे.'

या ट्वीटनंतर अनुराग कश्यप याच्यावर खूप सोशल मीडियावर खूप टीका झाली. नेटकऱ्यांनी त्यांना चांगलचं ट्रोल केलं.

कलम 370 बद्दल अनुराग कश्यप म्हणतो, Article 370 किंवा 35A बद्दल मी फार काही बोलू शकत नाही. याचे परिणाम, इतिहास, वास्तव या सगळ्या गोष्टींबद्दल मला अजून सगळ्या गोष्टी कळलेल्या नाहीत. कधीकधी वाटतं, हे कलम रद्द झालं हे चांगलं झालं, कधीकधी वाटतं हे कलम रद्द व्हायला नको होतं. मी काही काश्मिरी मुसलमान नाही की काश्मिरी पंडित. माझा काश्मिरी मित्र म्हणतो, काश्मीरची कहाणी 'राशोमान' सिनेमासारखी आहे.

अनुराग कश्यप यांनी आणखीही काही ट्वीट केले आहेत. एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे, काश्मीरचे अनेक पैलू आहेत. सगळेच योग्य आहेत आणि सगळेच अयोग्यही आहेत. मला फक्त एवढंच माहीत आहे, हे सगळं ज्या पद्धतीने झालं ते चुकीचं होतं.

अनुराग कश्यप हे अनेकदा त्यांच्या ट्वीटमुळे वादात सापडतात. त्यांचं काश्मीरबद्दलचं हे ट्वीटही वाद निर्माण करणारं आहे.

====================================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: August 7, 2019, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading