मुंबई, 09 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Death Case) तपास एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचला आहे. मनी लाँड्रिंग, ड्रग्ज असे विविध अँगल या प्रकरणात समोर येत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूनंतर काही गोष्टींची वारंवार चर्चा झाली होती, त्या म्हणजे नेपोटिझम आणि आउटसायडर्सना इंडस्ट्रीमध्ये मिळणारी वागणूक. यामध्ये करण जोहर, आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साळी, अनुराग कश्यप या सर्वांवर आरोप करण्यात आले होते. काहींवर त्यांनी मुद्दाम सुशांतला डावलले असा आरोप देखील करण्यात आला होता.
दरम्यान दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurah Kashyap) याने याबाबात एक खुलासा केला आहे. त्याने ट्विटरवर असे म्हटले आहे की सुशांतबरोबर काम न करण्याची त्याची काही कारणं होती. त्याने सुशांंतच्या मॅनेजरबरोबरच्या चॅटिंगचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. अनुराग कश्यपने दिलेल्या माहितीनुसार हे चॅट सुशांतच्या मृत्यूच्या तीन आठवडे आधीचे आहे.
(हे वाचा-'ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर रेणुका शहाणेंचा सवाल)
अनुरागने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मला माफ करा कारण मी हे करत आहे पण त्याच्या मृत्यूच्या 3 आठवडे आधीचे हे चॅट आहे. त्याच्या मॅनेजरबरोबर 22 मे रोजी चॅट केले होते. आतापर्यंत हे शेअर करावेसे वाटले नाही पण आता गरज वाटते आहे. हो मला त्याच्याबरोबर काम करायचे नव्हते, त्यासाठी माझी स्वत:ची काही कारणं होती'.
I am sorry that I am doing this but this chat is from three weeks before he passed away. Chat with his manager on 22 May .. havent don’t it so far but feel the need now .. yes I didn’t want to work with him for my own reasons .. https://t.co/g4fLmI5g9h pic.twitter.com/cHSqRhW9BD
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) September 9, 2020
या ट्वीटमध्ये शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये अनुराग कश्यपने एक संभाषण शेअर केले आहे. सुशांतच्या मॅनेजरबरोबरचे हे संभाषण 22 मे चे असल्याचे अनुराग कश्यपने म्हटले आहे. या संभाषणामध्ये असे म्हटले आहे की-
मॅनेजर-आशा करतो की तुम्ही ठीक आहात
अनुराग कश्यप- हो, तुम्ही ठीक आहात?
मॅनेजर- हो मी माझ्या होमटाऊनमध्ये आहे. इथे शेत तयार केले होते. अखेर त्याचा वापर होत आहे त्यामुळे आनंदात आहे. मला माहितेय तुम्हाला असे लोकं आवडत नाहीत जे अभिनेत्यांची शिफारस करतात. मला असे वाटते की मी तुमच्याबरोबर हा एक चान्स घेता येईल. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याबरोबर सुशांत कुठेही फिट होत असेल तर कृपया त्याच्याबाबत ध्यानात ठेवा. एक प्रेक्षक म्हणून, मला तुम्हाला दोघांना काहीतरी ग्रेट क्रिएट केलेलं पाहायला आवडेल.
अनुराग कश्यप- तो खूप प्रॉब्लेमेटिक आहे, मी त्याला सुरूवातीपासून ओळखतो.
(हे वाचा-वाढदिवशी अक्षय कुमारचे चाहत्यांना खास गिफ्ट, 'बेलबॉटम'मधील लुक रिव्हील)
अनुरागने हे चॅट शेअर केल्यानंतर त्याने सुशांतच्या चाहत्यांचा कमालीचा रोष सोशल मीडियावर ओढावून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारे अनुराग कश्यपवर टीका केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant Singh Rajput