मुंबई, 28 मार्च : भारतातील मोठा प्रेक्षक वर्ग हा सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळला आहे. दर महिन्याला ओटीटी माध्यमांवर नवी वेब सीरिज, नवे सिनेमे, डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ओटीटी माध्यम हे प्रेक्षकांसाठी स्वस्त आणि टिकाऊ माध्यम बनलं आहे. कारण या ठिकाणी एकाच वेळी अनेक भाषांमधील कॉन्टेन्ड पाहायला मिळतो. यातल कॉमेडी, क्राइम, ड्रामा, हॉरर वेब सीरिज आणि सिनेमांचा समावेश असतो. पण आज आपण अशा ४ सिनेमांविषयी जाणून घेणार आहोत ज्या पाहून डोकं चक्रावून जातं. अनेकवेळा पाहूनही ती कलाकृती नेमकी काय आहे? असा प्रश्न पडतो. त्याचं कथानक प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा सिनेमा पाहण्यासाठी भाग पाडते.
नो स्कोमिंग
अनुराग कश्यपच्या नो स्मोकिंग हा सिनेमा झी 5वर उपलब्ध आहे. सिनेमात चेन स्मोकर असलेल्या व्यक्तीची कथा दाखवण्यात आली. ज्याला सिगरेटचं व्यसन सोडायचं आहे आणि त्यासाठी तो एका रिहबमध्ये जातो. तिथे तो कसा फरतो हे सिनेमात दाखवण्यात आलं आहे. जॉन अब्राहम, परेश रावल आणि आयशा टाकिया प्रमुख भूमिकेत आहेत.
हेही वाचा - शाहरुख खानची पहिली हिरॉईन आहे 'ही' मराठमोळी अभिनेत्री; रिअल लाईफमध्ये खलनायकाशी बांधली लग्नगाठ
ऑ
काजल अग्रवाल, नित्या मेनन आणि रेजिना प्रमुख भूमिकेत असलेला तेलुगू सिनेमा ऑ नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. सिनेमात एका मल्टीपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर पीडित मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. तिच्या आयुष्यात या डिसॉर्डरमुळे किती अडचणी आहेत हे सिनेमात दाखवण्यात आलं आहे. प्रशांत वर्मा यांनी हा सिनेमा डिरेक्ट केला आहे.
चुरूली
जलीकट्टूचे डायरेक्टर लिजो जोस पेल्लीसरी यांचा चुरूली हा मल्याळम सिनेमा. सिनेमात गीथी संगीता, जोजू जॉर्ज, चेंबन विनोद हे प्रसिद्ध कलाकार आहेत. हा सिनेमा सोनी लिववर उपलब्ध आहे. दोन अंडरकवर पोलिसांवर आधारित आहे. जे क्रिमिनलला पकडण्यासाठी एका गावात राहत आहेत. गावात त्यांच्याबरोबर कशाप्रकारची संकंट येतात हे सिनेमात पाहायला मिळतं.
लुसिया
लुसिया हा कन्नड सिनेमा एक सायको थ्रिलर आहे. अभिनेता सतीश, श्रृती हरिहरन आणि ऋषभ शेट्टी सारखे दमदार कलाकार आहेत. सन एनएक्सटीवर हा सिनेमा उपलब्ध आहे. हा सिनेमा अशा एका व्यक्तीवर आधारित ज्याला झोप येत नाही. झोप येण्यासाठी तो ड्रग खरेदी करतो. नंतर त्याचे त्याच्यावर कसे अजीब अजीब परिणाम होतात हे सिनेमात पाहायला मिळतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News