मुलीपेक्षा फक्त 6 वर्षांने मोठी आहे अनुराग कश्यपची गर्लफ्रेंड

मुलीपेक्षा फक्त 6 वर्षांने मोठी आहे अनुराग कश्यपची गर्लफ्रेंड

  • Share this:

15 जून : आपल्या अत्यंत अनोख्या पद्धतीच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध अभिनेता अनुराग कश्यप पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. दोनवेळा लग्नाच्या बंधनात अडकलेला अनुराग कश्यप आता आपल्या 23 वर्षाच्या तिसऱ्या गर्लफ्रेंडसोबत रोमांस करत आहे. शुभ्रा शेट्टी असं त्याच्या तिसऱ्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. अनुराग त्याच्या वयापेक्षा 21 वर्षांनी लहान असलेल्या तरुणीशी लवकरच लगीनगाठ बांधणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

Love ❤️

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

गेल्या काही दिवसांत शुभ्रा शेट्टीसोबत अनुरागचे नातेसंबंध असल्याच्या चर्चा होत्याच. मात्र आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झालाय. अनुरागने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शुभ्रासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. 23 वर्षीय शुभ्रा 44 वर्षीय अनुराग कश्यपला डेट करत आहे. विशेष म्हणजे अनुरागची 17 वर्षांची मुलगी आलियापेक्षा शुभ्रा फक्त काही वर्षांनींच मोठी आहे.

We are killing it #Rupalsid

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

अनुराग कश्यप 2003 मध्ये आरती बजाजसोबत लग्नाच्या बेडीत अडकला होता. सहा वर्षांच्या संसारानंतर 2009 मध्ये दोघांनी काडीमोड घेतला. त्यानंतर अनुरागचं कल्की कोएचलीनसोबत डेटिंग सुरु झालं. 2011 अनुराग-कल्की विवाहबंधनात अडकले. देवडी या चित्रपटातून कल्कीला त्याने बॉलिवूडमध्ये लाँच केलं. कल्की बी टाऊनमध्ये काहीशी स्थिरावलीही. मात्र चार वर्षांच्या सहजीवनानंतर दोघांनी 2015 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Beauty and the Beast .. just to clarify I am the beauty ..

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

2016 च्या अखेरीस शुभ्रा शेट्टी अनुरागच्या आयुष्यात आल्याचं सांगितलं जातं. दोघं लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चाही दबक्या आवाजात सुरु झाल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनुराग कश्यप 44 वर्षांचा आहे, तर शुभ्रा अवघी 23 वर्षांची. म्हणजेच दोघांच्या वयात तब्बल 21 वर्षांचं अंतर आहे. दोघांनी लगीनगाठ बांधल्यास अनुरागचं हे तिसरं लग्न असेल.

The girls of @fuhsephantom @shubhrashetty @shwetabasuprasad11 photo by Vikramaditya Motwane

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2017 02:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading