अनुराग कश्यपचं ट्विटरला गुड बाय, नेमकं काय आहे या मागचं कारण?

अनुराग कश्यपचं ट्विटरला गुड बाय, नेमकं काय आहे या मागचं कारण?

काही दिवसांपूर्वी त्यानं काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्याबद्दल त्याच्या ट्विटरवर नकारात्मक ट्वीट केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्यानं काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्याबद्दल नकारात्मक ट्वीट केलं होतं. या ट्वीटवरून त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. याशिवाय लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला बहुमत मिळाल्यानंतर त्यानं मोदींचे समर्थक त्याच्या मुलीला रेपच्या धमक्या देत असल्याचं ट्वीट केलं होतं. ज्यामुळे सगळीकडे खूप गोंधळ उडाला होता आणि यावरूनही त्याला खूप ट्रोल केल गेलं होतं. त्यामुळे सततच्या या ट्रोलिंगला कंटाळून अनुरागनं ट्विटरला गुडबाय करण्याचा निर्णय घेतला आहे.

Saaho Trailer : सुपरस्टार प्रभासचा हॉलिवूडपेक्षाही जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार!

अनुरागनं खूप निराश होऊन हा निर्णय घेतला असून याबाबत त्यानं सलग दोन ट्वीट करुन त्यानंतर ट्विटर सोडलं. त्यानं शनिवारी 10 ऑगस्टला शेवटचं ट्वीट करून तो ट्विटर सोडत असल्याचं जाहीर केलं. माझे आई-वडील आणि मुलीला धमक्या येत असल्यानं यामुळेच मी ट्विटर सोडत असल्याचं त्यानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर त्यानं त्याचं ट्विटर अकाउंट डिलीट केलं आहे. मागच्या काही काळापासून अनुराग त्याच्या ट्वीटमुळे ट्विटरवर खूप ट्रोल होत आहे.

...तर माझंही 'तिहेरी तलाक'ला समर्थन असतं, विद्या बालनची प्रतिक्रिया

त्यानं लिहिलं, जेव्हा तुमच्या आई-वडीलांना कॉल करून आणि मुलीला ऑनलाइन धमकी मिळते. त्यावर कोणी काही बोलत नाही. काही कारणही नाही बोलायचं. ठगांचं शासन आहे आणि त्यांची जगण्याची काहीतरी नवी पद्धत असेल. अशा नव्या भारतासाठी तुम्हाला सर्वाना शुभेच्छा.

त्यानंतर अनुरागनं लगेचच दुसरं ट्वीट केलं. त्यामध्ये त्यानं लिहिलं, ‘सर्वांना शुभेच्छा! हे माझं शेवटचं ट्वीट आहे. कारण मी ट्विटर सोडत आहे. जर मी कोणत्याही भीतीशिवाय माझं मत मांडू शकत नसेन तर हेच चांगलं होईल की, मी काहीच बोलू नये. गुड बाय’ यामुळे अनुराग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ट्विटरवर अनेक सोक त्याचं समर्थन केलं आहे. तर अद्याप काही लोकांनी पुन्ह एकदा त्याला विरोध दर्शवला आहे.

VIDEO : संगतीचा परिणाम! अतरंगी ड्रेसमुळे दीपिका पदुकोण झाली ट्रोल

==============================================================

पुरातून वाचवताना निसटला आणि झाडाला अडकला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

First published: August 11, 2019, 2:51 PM IST

ताज्या बातम्या