बर्थडे स्पेशल: अनुराधा पौडवाल  

1973 पासून ते आतापर्यंत अनुराधांनी 1500 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी कन्नड, मराठी अशा इतर भाषांमध्येही त्यांनी सुपरहिट गाणी गायली आहेत. अनुराधा यांनी अनेक भक्तीगीतं आणि भजनं गायली आहेत. 2017मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. अमुराधा यांना त्यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त खुप खूप शुभेच्छा.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2017 08:53 AM IST

बर्थडे स्पेशल: अनुराधा पौडवाल  

27 ऑक्टोबर:  गाणी आणि संगीतामुळे भारतीय सिनेमासृष्टी नेहमीच खास ठरली आहे. म्हणूनच हिंदी सिनेमांनी एकापेक्षा एक गायक आणि संगीतकारांची निर्मिती केली आहे. याच खजिन्यातला एक सुमधुर आवाज म्हणजे अनुराधा पौडवाल. आज त्यांचा 62वा वाढदिवस आहे.

27 ऑक्टोबर 1954 मध्ये जन्मनाऱ्या अनुराधांनी 1976मध्ये गायनाला सुरूवात केली. 80च्या दशकात जेव्हा कॅसेट आणि टेपची संस्कृती वाढू लागली, तेव्हा या व्यवसायासाठी अनेक उद्योगपती पुढे सरसावले. याच काळात जुन्या गायकांची गाणी पुर्ननिर्मित करण्याचेही प्रमाण वाढत होते. त्याच दरम्यान अनुराधा यांनी त्यांच्या गायनाची जादूने साऱ्यांनाच प्रेमात पाडले.त्यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या 'अभिमान' सिनेमातून 1973मध्ये गायन क्षेत्रात पदार्पण केलं. याच सिनेमात त्यांनी संस्कृताचे श्लोकही गायले आहेत.

1973 पासून ते आतापर्यंत अनुराधांनी 1500 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी कन्नड, मराठी अशा इतर भाषांमध्येही त्यांनी सुपरहिट गाणी गायली आहेत. अनुराधा यांनी अनेक भक्तीगीतं आणि भजनं गायली आहेत. 2017मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. अमुराधा यांना त्यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त खुप खूप शुभेच्छा.

अनुराधा लता मंगेशकरंच्या खुप मोठ्या चाहत्या आहेत. त्यांनी गायनाचा सरावसुद्धा लता यांना ऐकूनच केला, म्हणून त्यांनी लता मंगेशकरांनी गायलेली अनेक गाणी पुन्हा गायली. या गाण्यांनी जुन्या काळातला तो प्रेमाचा बहार परत आणला आणि त्यांना एक नवीन ओळख दिली.

अनुराधा यांना आजही लता मंगेशकरांची गाणी ऐकायला खूप आवडतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 12:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...