Home /News /entertainment /

'धक धक...' मध्ये माधुरीनं ‘आऊच’ का केलं? अनुराधा पौडवाल यांनी सांगितला भन्नाट किस्सा

'धक धक...' मध्ये माधुरीनं ‘आऊच’ का केलं? अनुराधा पौडवाल यांनी सांगितला भन्नाट किस्सा

‘धक धक करने लगा’मध्ये ‘आऊच’ हा शब्द कसा आला? पाहा अनुराधा पौडवाल यांनी सांगितला गंमतीशीर किस्सा

  मुंबई 21 मे: ‘धक धक करने लगा’ (Dhak Dhak Karne Laga) हे बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. या गाण्यामुळंच माधुरी दिक्षितला (Madhuri Dixit) बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ असं म्हटलं जाऊ लागलं. या गाण्यात तिनं केलेल्या मादक हरकती अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी स्वरबद्ध केल्या होत्या. गाण्याच्या सुरुवातीलाच येणाऱ्या आऊचमुळं हे गाणं आज तब्बल 20 वर्षानंतरही तितकच लोकप्रिय आहे. किंबहुना माधुरी जिथे कुठे जाते तिथं तिच्या एण्ट्रीवर हे आऊच असं म्युझिक वाजवलं जातं. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल या आऊचचा देखील एक गंमतीशीर किस्सा आहे. तर मग पाहूया गाण्यात हे आऊच का आणि कसं आलं? अनुराधा पौडवाल यांनी अलिकडेच इंडियन आयडल या संगीत शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी धकधक गाण्यातील हा आऊचचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “जेव्हा 'धक धक करने लगा' या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं तेव्हा मला बाहेरगावी जाण्यासाठी विमान पकडायचं होतं. रेकॉर्डिंगमुळे मला आधीच उशीर होत होता. निर्मात्यांनी सांगितलं की उद्यापासून चित्रीकरण सुरू होतंय तर रेकॉर्डिंग पूर्ण करूनच जा. मला सांगितलं गेलं की, गाण्यात सुरुवातीलाच काहीतरी आकर्षक आणि सिडक्टिव्ह शब्द आला पाहिजे जसं अरे रे रे. मी थोडा विचार केला आणि आऊच असा शब्द उच्चारला. खरं तर मी सहजच असं म्हटलं होतं. पण संतीतकारांनी तो शब्द तसाच ठेवला. लक्षवेधी बाब म्हणजे माधुरीनं देखील या शब्दावर दिलखेचक अभिनय केला. त्यामुळे हा शब्द आणि हे गाणं इतकं लोकप्रिय झालं. या गाण्याचं संपूर्ण श्रेय मी माधुरीला देते.” शिवानी बावकर चाहत्यांकडे मागतेय आर्थिक मदत; हवं आहे 16 कोटींचं इंजेक्शन
  धक धक हे गाणं अत्यंत बोल्ड असल्याचं त्यावेळी म्हणण्यात आलं होतं. सेन्सॉर बोर्डानेही गाण्यावर आक्षेप घेतला होता. गाणं शूट करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ ठेवण्यात आला होता, पण फक्त तीन दिवसांत गाण्याचं शूटिंग पूर्ण झालं. सरोज खान यांच्या दिग्दर्शनाखाली हे गाणं शूट करण्यात आलं. माधुरीला ‘बेटा’ चित्रपटासाठी त्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. अन् तिथूनच चित्रपटात काम मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेली माधुरी एकाएकी सुपरस्टार झाली. तिची तुलना थेट श्री देवीशी केली जाऊ लागली.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Bollywood actress, Madhuri dixit, Song

  पुढील बातम्या