Home /News /entertainment /

'अनुपमा' फेम मराठमोळ्या अनघा भोसलेने का सोडली टीव्ही इंडस्ट्री? केला मोठा खुलासा

'अनुपमा' फेम मराठमोळ्या अनघा भोसलेने का सोडली टीव्ही इंडस्ट्री? केला मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी 'अनुपमा' (Anupamaa) या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये नंदिनीची भूमिका साकारणाऱ्या अनघा भोसलेनेही (Angha Bhosle) मनोरंजनसुष्टी सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता अनघा भोसलेने अखेर मनोरंजनसृष्टी सोडण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 26 मार्च-   मनोरंजनसृष्टीत अनेक नव्या अभिनेत्री आपलं नशीब आजमावण्यासाठी येत आहेत. तर अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी या जगताला रामराम केलं आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सना खान (Sana Khan) आणि दंगल फेम जायरा वसीमसारख्या  (Zaira Wasim) अभिनेत्रींनी याआधीच मनोरंजनसृष्टी सोडत सर्वांनाच चकित केलं आहे. या दोघीनींही त्यांच्या धार्मिक श्रद्धेमुळे इंडस्ट्री सोडली होती.  आता काही दिवसांपूर्वी 'अनुपमा'(Anupamaa) या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये नंदिनीची भूमिका साकारणाऱ्या  अनघा भोसलेनेही  (Angha Bhosle) मनोरंजनसुष्टी सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता अनघा भोसलेने अखेर मनोरंजनसृष्टी सोडण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. 'अनुपमा' फेम अभिनेत्री अनघा भोसलेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सला सांगितलं  आहे की, ती अधिकृतपणे चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडत आहे. अनघाने या पोस्टद्वारे असं  करण्यामागचं  कारणदेखील  स्पष्ट केलं आहे. अनघाच्या पोस्टवरून असं  दिसून आलं आहे की, ती तिची 'धार्मिक श्रद्धा आणि आध्यात्मिक मार्गा'मुळे हा निर्णय घेत आहे. पोस्टमध्ये अनघा लिहिते- 'हरे कृष्ण परिवार. मला माहित आहे की तुम्ही सर्वजण  माझ्यासोबत दयाळूपणे वागलात आणि शो नंतर काळजी व्यक्त केली.  आणि त्याबद्दल मी खरंच  आभारी आहे. माझा विश्वास आहे की सर्व देवाची मुले आहेत आणि वेगवेगळ्या मार्गांनी त्याला स्वीकारतात. तिने तिच्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं की ती चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून बाहेर पडत आहे'.
  अनघाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे आहे की,  ''लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की मानव जन्म हा देवाची सेवा आणि प्रेम करण्यासाठी आणि कृष्णाच्या भावना  पसरविण्यासाठी आहे.त्यांचं असं मत होतं की, लोकांनी अशा परिस्थितीपासून  किंवा लोकांपासून दूर जावं जी देव आणि त्यांच्यामध्ये अंतर वाढवत आहेत''.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Tv actress

  पुढील बातम्या