Home /News /entertainment /

VIDEO: वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पोहोचली 'अनुपमा'; चप्पल न घालता केली पदयात्रा

VIDEO: वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पोहोचली 'अनुपमा'; चप्पल न घालता केली पदयात्रा

टीव्ही मालिका 'अनुपमा' (Anupama) फेम अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguli) नववर्षाच्या मुहूर्तावर वैष्णोदेवीच्या भेटीला गेली आहे.

  मुंबई, 2 जानेवारी-  नवं वर्ष   (New Year 2022)  प्रत्येकासाठी नवीन आशा-अपेक्षा घेऊन आलं आहे. सर्वांनाच या नवीन वर्षाकडून विविध अपेक्षा आहेत. त्यामुळे सर्वत्र मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत झालं आहे. अशातच टीव्ही मालिका 'अनुपमा'  (Anupama)  फेम अभिनेत्री रुपाली गांगुली   (Rupali Ganguli)  नववर्षाच्या मुहूर्तावर वैष्णोदेवीच्या भेटीला गेली आहे. अभिनेत्रीने सर्वसामान्य भक्ताप्रमाणे मोकळ्या पायाने जाऊन देवीचं दर्शन घेतलं आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुलीने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फारच खास आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे, की अभिनेत्री नववर्षाचं औचित्य साधत वैष्णो देवीच्या दर्शनासाठी पोहोचली आहे. अभिनेत्रीने वैष्णो देवीच्या आशीर्वादाने आपल्या नव्या वर्षाची सुरुवात केली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री चालत वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Rups (@rupaliganguly)

  अभिनेत्रीने चाहत्यांसाठी लिहिली खास पोस्ट- अभिनेत्री रुपाली गांगुली छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. रुपाली गांगुलीने हा व्हिडीओ शेअर करत, कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'हे वर्ष आपल्या पुढील येणाऱ्या प्रत्येक दिवसांसाठी खूप काही घेऊन यावं. २०२२ मध्ये फक्त प्रेम, करुणा आणि दया घेऊन पुढे जा. देवाचा आशीर्वाद, आरोग्य आणि यश याकडे आपली वाटचाल व्हावी. जय माता दी, जय महाकाल'. असं म्हणत अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (हे वाचा:Sushant Singh Rajput च्या फेसबुक पेजवरून मिळाल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा ) अभिनेत्री रुपाली गांगुलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. यामध्ये अभिनेत्री चप्पल न घालता देवीच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहे. अभिनेत्रीचं हे रूप चाहत्यांना भावलं आहे. त्यामुळे चाहते कमेंट्स करून तिचं कौतुकदेखील करत आहेत. सध्या रुपाली गांगुली 'अनुपमा' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिका टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच पुढे असते. या मालिकेमुळे अभिनेत्रीला एक नवी ओळख मिळाली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Tv actress

  पुढील बातम्या