• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'अनुपमा'चा इतका ग्लॅमरस अंदाज कधी पाहिलाय का? फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

'अनुपमा'चा इतका ग्लॅमरस अंदाज कधी पाहिलाय का? फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

सीरियल 'अनुपमा'(Anupama) ची मुख्य अभिनेत्री रुपाली गांगुलीने(Rupali Ganguly) शोमध्ये अनुपमा हे मुख्य पात्र साकारून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

 • Share this:
  मुंबई, 19ऑक्टोबर- सीरियल 'अनुपमा'(Anupama) ची मुख्य अभिनेत्री रुपाली गांगुलीने(Rupali Ganguly) शोमध्ये अनुपमा हे मुख्य पात्र साकारून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या सिरीयलमध्ये लोक तिला प्रचंड पसंती दर्शवत आहेत. तसेच शोच्या टीआरपी रेसमध्येही हा शो अव्वल आहे. त्याचबरोबर शोमध्ये पारंपारिक शैलीत दिसणारी रूपाली गांगुली इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते, आणि सतत प्रेक्षकांना आपल्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.आता रुपाली गांगुलीने तिचा ग्लॅमरस(Glamours Look) अंदाज चाहत्यांना दाखवला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे जो चाहत्यांना फारच आवडत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Rups (@rupaliganguly)

  या फोटोमध्ये रुपाली गांगुली खूपच बोल्ड दिसत आहे. तिने स्ट्रॅपलेस टॉप घातला आहे.सोबतच तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. आणि हलका मेकअप करून लुककंप्लिट केला आहे. तसेच, ती एक गोंडस स्माईल देत आहे. रुपाली गांगुली या लूकमध्ये इतकी सुंदर दिसत आहे की प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळून राहत आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Rups (@rupaliganguly)

  रुपाली गांगुलीने आपला फोटो शेअर करत त्याला एक सुंदर कॅप्शनही दिलं आहे, कॅप्शन लिहीत तिनं म्हटलं आहे, 'स्वप्ने, पंख आणि डोळे एक कथा सांगतात, तुम्ही कोणती कथा वाचली? चाहत्यांना रुपालीचा हा अंदाज फारच पसंत पडत आहे. चाहते फोटोवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देऊन तिचं कौतुक करत आहेत. तिचा मोठा चाहतावर्गसुद्धा आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १.८ मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. यापूर्वी रुपाली गांगुली आपल्या मुलाच्या वाढदिवशी पूलमध्ये एन्जॉय करताना दिसली होती. (हे वाचा:Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात मोठा धमाका; 2 स्पर्धकांना दाखवला बाहेरचा रस्ता) अभिनेत्री रुपाली गांगुलीने 2013 मध्ये अश्विन वर्मासोबत लग्न केलं होतं. अश्विन हा क्रिएटिव्ह कंपनीचा मालक आहे. दोघांना रुद्रांश नावाचा मुलगा आहे. रूपाली अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे सुंदर फोटो शेअर करत असते. रुपाली गांगुलीचा भाऊ एक सुप्रसिद्ध फोटोग्राफर आहे.त्याचबरोबर रुपाली गांगुली साराभाई वर्सेज साराभाई, बा बहू और बेबी, बिग बॉस 1, खतरों के खिलाडी समाज अशा अनेक प्रसिद्ध शोमध्ये दिसली आहे. रुपाली गांगुली बऱ्याच काळापासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि अनुपमा सीरियलच्या आधीसुद्धा ती खूप लोकप्रिय अभिनेत्री राहिली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: