मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rupali Ganguly: टेलिव्हिजनवर सर्वाधिक पैसे कमवणारी अभिनेत्री एकेकाळी कमवायची 180 रुपये; कसा होता अनुपमाचा प्रवास?

Rupali Ganguly: टेलिव्हिजनवर सर्वाधिक पैसे कमवणारी अभिनेत्री एकेकाळी कमवायची 180 रुपये; कसा होता अनुपमाचा प्रवास?

सध्या जिची भूमिका अनेकांसाठी प्रेरणा ठरते अशा अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीची लाईफ स्टोरी सुद्धा अनेकांना प्रोत्साहन देणारी आहे.

सध्या जिची भूमिका अनेकांसाठी प्रेरणा ठरते अशा अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीची लाईफ स्टोरी सुद्धा अनेकांना प्रोत्साहन देणारी आहे.

सध्या जिची भूमिका अनेकांसाठी प्रेरणा ठरते अशा अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीची लाईफ स्टोरी सुद्धा अनेकांना प्रोत्साहन देणारी आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 09 ऑगस्ट: टीव्ही जगतात सर्वाधिक पेमेंट मिळणारी अभिनेत्री म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ती म्हणजे () रुपाली गांगुली. रुपालीने खूपच कष्टाच्या काळाचा सामना करत हा प्रवास साध्य केल्याचं समोर आलं आहे. सध्या रुपाली ‘अनुपमा’ नावाच्या सुपरहिट मालिकेमध्ये दिसून येत आहे. टीव्ही जगतात एखाद्या अभिनेत्रीच्या पात्राला एवढी लोकप्रियता मिळणं जरी नवं नसलं तरी तिचा प्रवास मात्र अनेकांना प्रेरणा देणारा आहे. सध्या भूमिकेसाठी चिक्कार पैसे मोजणारी ही अभिनेत्री एकेकाळी 180 रुपये कमवायची अशी माहिती समोर येत आहे. रुपालीचा जीवनप्रवास एका व्हिडिओमधून समोर आला आहे. रुपालीच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने ती नाटकांच्या माध्यमातून काम करून घरच्या आर्थिक परिस्थतीला हातभार लावत होती. रुपालीने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं असून एका बुटीकमध्ये वेटर म्हणून काम कार्याचे तिला तासाच्या हिशोबाने 180 रुपये मिळत होते. तिच्याकडे पैशांची चणचण असल्याने तिला चालत वरळीपर्यंत जाऊन ऑडिशन द्याव्या लागत होत्या. चालून दमल्याने तिच्या ऑडिशनवर तिला नीट लक्ष केंद्रित करता येत नव्हतं आणि तिच्या प्लॅनिंगप्रमाणे काहीच घडत नव्हतं. पण ती हार मानता पुन्हा एका संधी मागून त्या संधीचं सोनं कुणी ती इथवर पोहोचली आहे. तिने अनेकदा आपल्या नवऱ्याने आणि वडिलांनी दाखवलेल्या पाठिंब्याबद्दल वक्तव्य केलं आहे. रुपालीचा प्रवास हा लोकप्रिय मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मधून झाला. या शोमुळे आणि त्यातील मोनिशा या पात्रामुळे तिला आजही ओळखलं जातं. या मालिकेने रुपालीला नवी ओळख, आयुष्यभराचे मित्र दिले. आणि अनुपमा सुरु होण्याआधी अचानक करिअरच्या उंचीवर असताना तिने ब्रेक घेऊन कुटुंबाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. हे ही वाचा- Alia Bhatt: बेबी बम्प आणि प्रेग्नंन्सी ग्लोच्या बातम्यांवर आलियाने दिली सणसणीत रिऍक्शन; म्हणाली... “माझ्या करिअरचा ग्राफ उंचावत असताना मी घेतलेला ब्रेक अनेकांसाठी धक्कादायक होता पण मला त्याचं दुःख नाही. मी आई होऊ शकणार नाही असं मला सांगण्यात आलेलं. त्यामुळे मी प्रेग्नन्ट असल्यापासून ते माझ्या मुलाच्या जन्मापर्यंत आणि अगदी त्यापुढची 6 वर्ष मी घरासाठी द्यायची ठरवली. त्याला एक एक पाऊल टाकताना बघणं हे माझ्यासाठी गरजेचं होतं.” असं तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
सध्या रुपाली ही अनेक नवोदित अभिनेत्रींनसाठी अनेक अनेक महिलांसाठी एक रोल मॉडेल आहे. तिचा हा प्रवास प्रेरणा देणारा आहे तसंच सध्या तिची भूमिकाही अशीच प्रेरणादायी आहे.
First published:

Tags: Tv actress, Tv celebrities

पुढील बातम्या