मुंबई 7 मार्च: अनुपम खेर (Anupam Kher) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ट्विट्स, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यावेळी देखील त्यांनी असंच एक गंमतीशीर ट्विट करुन सर्वांनाच अवाक केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सूर्यवंशम (Sooryavansham) चित्रपटाची खिल्ली उडवली आहे.
सोनी मॅक्स या वाहिनीनं काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. “हिरा आपले वडिल भानु प्रताप सिंह यांचं मन जिंकू शकेल का?” असा सवाल करत त्यांनी सूर्यवंशम या चित्रपटाची जाहिरात केली होती. हे ट्विट त्यांनी अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांना देखील टॅग केलं होतं. अर्थात याच ट्विटवरुन अनुपम खेर यांनी चित्रपटाची खिल्ली उडवली.
अवश्य पाहा - 'मी दृष्टिहीन झालोय...'; शस्त्रक्रियेनंतर बिग बींनी दिली पहिली प्रतिक्रिया
“हा..हा..हा..हा.. माझ्या प्रिय सोनी मॅक्सवाल्यांनो तुमचा हा प्रश्न पाहून माझं हसू थांबत नाही आहे. तुम्ही हा चित्रपट इतक्या वेळा दाखवला आहे की आता या प्रश्नाचं उत्तर चंद्रावर राहणारे लोक देखील देऊ शकतात.” अशा आशयाची प्रतिक्रिया अनुपम खेर यांनी दिली. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हाहाहाहा !! मेरे प्यारे @sonymax2movies वालो!! आपके इस सवाल को देखकर मैं अपनी हँसी रोक नहीं पाया।ये फ़िल्म आपने इतनी बार दिखाई गई है कि अब तो इस सवाल का जवाब चाँद पे रहने वाले लोग भी दे सकते हैं।जय हो!! https://t.co/Rurzb9HY6r
— Anupam Kher (@AnupamPKher) February 28, 2021
सूर्यवंशम सोनी मॅक्सवर सतत का दाखवतात?
21 मे 1999 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला 22 वर्ष झाली असली तरी आजही या चित्रपटाची चर्चा असते.'सेट मॅक्स' या वाहिनीनं हा चित्रपट अजरामर केला आहे. यामुळेच सोशल मीडियावर हा चित्रपट नेहमी चर्चेत असतो. हा चित्रपट जवळपास दररोज ‘सोनी मॅक्स’ या चॅनलवर दाखवला जातो. सात कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं त्यावेळी 12कोटी 65 लाख रुपयांची कमाई केली होती. चॅनलने ‘सूर्यवंशम’चे 100 वर्षांचे राईट्स विकत घेतले आहेत. त्यामुळे हा चित्रपट वारंवार दाखवला जातो. अशी माहिती सोनी मॅक्सच्या मार्केटिंग हेड वैशाली शर्मा यांनी एका मुलाखतीत दिली होती. यामधील 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. याचाच अर्थ पुढील 78 वर्ष हा चित्रपट सेट मॅक्सवर दाखवला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Anupam kher, Entertainment, Social media, Twitter