मुंबई, 2 जानेवारी : सरत्या वर्षाला निरोप देताना प्रत्येकाने नव्या वर्षाच्या हटके शुभेच्छा देत नववर्षाचं स्वागत केलं. अभिनेते अनुपम खेर यांनी दिलेल्या शुभेच्छा मात्र खरंच वेगळ्या आहेत. त्यांनी आपल्या आईसोबतचा हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
या व्हिडिओत अनुपम खेर यांच्याबरोबरीनं शुभेच्छा देणाऱ्या आहेत दुलारी खेर... अनुपमची आई. आईकडून शुभेच्छा संदेश कसा म्हणून घेतला, ते या व्हिडिओत पाहण्यासारखं आहे. अनुपमची आई अभिनेता मुलालाही भारी पडली जेव्हा ती स्वतःच म्हणाली - दुलारी रॉक्स!
Wishing you all a very #HappyNewYear along with Dulari. It is a separate issue that Mom is also saying, “मार पड़ेगी” to me on the 1st day of 2019. . But that is an expression of mother’s pure love. Have a great year my friends. Love and happiness always. #DulariRockspic.twitter.com/MXCy87NHsW
अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांची आई दुलारी खेर या नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. यात शुभेच्छा देताना अनुपम खेर यांच्यावर रागवत आई दुलारी मार मिळेल असेही म्हणते. आईचा हा राग म्हणजे खरं मातृप्रेम असल्याचे अनुपम खेर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
सध्या अनुपम खेर यांच्या ‘दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर आधारित चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या सिनेमात मनमोहन सिंग यांची भूमिका अनुपम खेर साकारत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय गुट्टे यांनी केलं आहे. येत्या 11 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.