S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

अनुपम खेर यांची 'लंच' डिप्लोमसी

11 ऑक्टोबरला अनुपम खेर यांचं नाव घोषित करण्यात आलं. गंमत म्हणजे अनुपम खेर हे या संस्थेचे विद्यार्थी होते. 1978 साली त्यांनी या संस्थेत अभिनयाचं शिक्षणही घेतलं होतं. 'मला परत या संस्थेत एक विद्यार्थी म्हणून यायची इच्छा होती.त्यामुळे मी कुणालाही न सांगता इथे आलो' असं ते म्हणाले.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 16, 2017 04:12 PM IST

अनुपम खेर यांची 'लंच' डिप्लोमसी

पुणे,16 ऑक्टोबर: एफटीआयआयचे नवनियुक्त अध्यक्ष अनुपम खेर यांनी एफटीआयआयला आज अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मेसमध्ये जेवण देखील केलं. ही भेट  अनुपम खेर यांची लंच डिप्लोमसी म्हणून पाहिली जाते आहे.

गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वीच संपला. त्यानंतर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. 11 ऑक्टोबरला अनुपम खेर यांचं नाव घोषित करण्यात आलं. गंमत म्हणजे अनुपम खेर हे या संस्थेचे विद्यार्थी होते. 1978 साली त्यांनी या संस्थेत अभिनयाचं शिक्षणही घेतलं होतं. 'मला परत या संस्थेत एक विद्यार्थी म्हणून यायची इच्छा होती.त्यामुळे मी कुणालाही न सांगता इथे आलो' असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला. तसंच विद्यार्थ्यांशी बोलून त्यांचे प्रश्नही अनुपम खेर यांनी समजून घेतले. 'मात्र आम्ही ज्या गोष्टी बोललो त्या आमच्यातच राहतील.उद्या मास्टर क्लास घेणार आहे. माझ्या नियुक्तीमुळे सगळे खूष आहेत'. असं यावेळी खेर यांनी सांगितलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2017 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close