मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /वरुण धवन-नताशा दलाल लग्नानंतर आलिशान घरात झाले शिफ्ट, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

वरुण धवन-नताशा दलाल लग्नानंतर आलिशान घरात झाले शिफ्ट, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

वरुण (Varun Dhawan) आणि नताशा (Natasha Dalal) यांच्या लग्नानंतर आता त्यांच्या अलिशान घराचा व्हिडीओ समोर आला आहे. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

मुंबई, 30 जानेवारी: बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) वरुण धवन (Varun dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) नुकतेच विवाहबंधनात (Marriage) अडकले आहेत. गेल्या 24 जानेवारी रोजी अलिबाग येथील एका अलिशान रिसॉर्टमध्ये यांचं शाही लग्न पार पडलं आहे. लग्नानंतर वरुण आणि नताशा त्यांच्या कुटुंबीयांसोबतच राहत होते, मात्र लवकरच आता दोघंही त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. वरुणने लग्नाच्या अगोदर 2017 मध्ये एक अलिशान घर (New home) खरेदी केलं होतं. वरुण आणि नताशा यांच्या लग्नानंतर आता त्यांच्या अलिशान घराचा व्हिडीओ समोर आला आहे. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नानंतर अनुपम खेर यांनी शूट केलेला एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. वरुणच्या घराचा जेव्हा गृहप्रवेश झाला होता, त्यावेळी अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिलं की, 'वरुण धवनने त्याचे नवीन घर दाखवले. त्याला मी लहानपणापासून ओळखतो, जेव्हा त्याचे वडील वेस्पा स्कुटरवर फिरायचे. त्यांच्या कष्टाचं मोल झालं आहे. वरुणची आई लाली धवन यांनी घरातील इंटीरियर डेकोरेट केलं आहे.'

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

या व्हिडीओमध्ये वरुण धवन अनुपम खेर यांना त्याचं संपूर्ण घर दाखवत आहे. वरुणच्या घरात एक शानदार जीमदेखील आहे. वरुणचं हे घर त्याच्या कुटुंबीयांच्या घरापासून अगदी जवळचं आहे. वरुणने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'त्याला सुरुवातीपासूनच वाटत होतं की, स्वतःच एक घर खरेदी करावं. त्यामुळे त्याने लग्नाच्या अगोदर स्वतःचं ड्रीम घर घेतलं आहे. वरुणने त्याचा हनीमून प्लॅन पुढे ढकलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरुण धवन त्याचा आगामी चित्रपट 'भेडिया' च्या शुटींगसाठी थांबला आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण अरुणाचल प्रदेशात होणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Varun Dhawan