मुंबई, 25 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. पण सध्या त्यांची चर्चा होतेय ती एका व्हिडीओमुळे. अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. जो मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा शाळेत प्रार्थना करताना दिसत आहे. पण या व्हिडीओमध्ये असं काही खास आहे. ज्यामुळे तुम्हालाही तुमच्या शाळेतले दिवस आठवल्याशिवाय राहणार नाही.
अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा शाळेत प्रार्थना करताना हात जोडून उभा असलेला दिसत आहे. पण यासोबतच या मुलानं त्याच्या हातात चॉकलेट अशा कौशल्यानं पकडलं आहे की त्याला ते प्रार्थना करता करता खाता येईल. अनुपम यांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या बालपणीची आठवण आली.
सनी लिओनीसोबत रोमान्स करताना दिसणार Bigg boss 13चा हा स्पर्धक
बिना समझ के भी, हम कितने सच्चे थे, वो भी क्या दिन थे, जब हम बच्चे थे।:) A morning school prayer somewhere in India. Love the way this child is singing and sucking on the pacifier with the same intensity.😍 #innocenceofachild pic.twitter.com/7u6ojuaxHX
— Anupam Kher (@AnupamPKher) January 24, 2020
आपलं बालपण किती निरागस असतं याचं उत्तम उदाहरण असलेला हा व्हिडीओ शेअर करताना अनुपम यांनी लिहिलं, जेव्हा आपल्याला समज नसते तेव्हा आणि किती प्रामाणिक असतो. काय दिवस होते ते जेव्हा आणि सुद्धा लहान होतो. भारतातल्या बहुतांश शाळांमध्ये सकाळची प्रार्थना अशाप्रकारे होते. पण ज्याप्रकारे हा लहान मुलगा प्रार्थना म्हणत आहे. पण त्यासोबतच तो लॉलीपॉप खात आहे ते पाहून बालपणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
अनेक संकटांवर मात करुन हे सेलिब्रेटी आले एकत्र, रिअल लाइफ फिल्मी लव्हस्टोरी
View this post on Instagram
अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला आता पर्यंत लाखो लोकांनी लाइक्स आणि रिट्विट केलं आहे. तर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करता आपल्या बालपणीच्या आठवणीही शेअर केल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून अनुपम खेर नसीरुद्दीन शाह यांच्यासोबतच्या भांडणामुळे चर्चेत आहेत. या दोघांमध्ये CAA आणि NRC च्या मुद्द्यावरुन वाद झाला होता. एकिकडे नसीरुद्दीन यांनी अनुपम खेर यांच्या मुद्द्यांना विनोदी म्हटलं होतं. तर दुसरीकडे अनुपम खेर यांनी नसीरुद्दीन यांना फ्रस्ट्रेटेड व्यक्ती म्हटलं होतं.
...म्हणून सेजल शर्माने उचलले टोकाचे पाऊल, ग्लॅमर्स दूनियेचा आणखी एक बळी!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anupam kher, Bollywood