मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kashmir Filesला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणाऱ्या नादेव वर भडकले अनुपम खेर

Kashmir Filesला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणाऱ्या नादेव वर भडकले अनुपम खेर

द काश्मीर फाईल्स

द काश्मीर फाईल्स

काश्मीर फाईल्लवर झालेल्या टीकेनंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे. पाहा ते काय म्हणाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 29 नोव्हेंबर : गोव्यात रंगलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची सांगता सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ज्यूरी हेड आणि इस्रायली सिनेमांचे निर्माते नादव लॅपिड यांनी मनोगत व्यक्त करताना काश्मीर फाइल्स सिनेमावर चांगलाच निशाणा साधला. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या सिनेमावर ज्युरींनी केलेल्या टीकेनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.  काश्मीर फाईल्स हा सिनेमा प्रोपगंडा आणि वल्गर असल्याची टीका ज्यूरी हेड नादव लॅपिड यांनी केली. या टीकेवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी संताप व्यक्त केला आहे.  ट्विट करत अनुपम खेर यांनी याचं उत्तर दिलं आहे.

काश्मीर फाईल्स हा सिनेमा वल्गर आणि प्रोपगंडा असल्याचं म्हटल्यानंतर निर्माते नादव लॅपिड यांचा मनोगतातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक जण यावर आपलं मत मांडत आहेत. अभिनेते अनुपम खेर हे या सिनेमात प्रमुख भूमिकेत होते. सिनेमावर झालेल्या टीकेनंतर अनुपम खेर यांनी गप्प न राहता यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हटलंय, 'असत्याची उंची कितीही मोठी असली तरीही सत्याच्या तुलनेमध्ये ती छोटीच असते. या ट्विटसह अनुपम खेर यांनी काश्मीर फाईल्समधला स्वत:चा फोटो आणि तिथल्या परिस्थितीचे काही जुनी फोटो पोस्ट केले आहेत'.

हेही वाचा - 'हा प्रोपगंडा आणि वल्गर सिनेमा...'; IFFIमध्ये काश्मीर फाईल्सवर साधला निशाणा, ज्यूरींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

अनुपम खेर यांच्यासह निर्माते अशोक पंडीत यांनीही याबाबत भाष्य करत ट्विट केलं आहे. 'माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नदल लॅपिड यांची इफ्फीच्या मुख्य ज्युरीच्या पदावर बसवणं हीच मोठी चूक होती. यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे', असं त्यांनी म्हटलं आहे.

इफ्फी महोत्सवाचे ज्युरी हेड नादव लॅपिड  म्हणाले, 'इफ्फी महोत्सवातील 15 सिनेमा होत द काश्मीर फाईल्स . पण हा सिनेमा पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. आम्ही सगळे अस्वस्थ झालो. हा सिनेमा एका विशिष्ट प्रोपगंडा असलेला आणि वल्गर आहे.  इफ्फी सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात काश्मीर फाईल्स सारख्या सिनेमाला स्थान मिळालं हे अयोग्य आहे'.

काश्मीर फाईल्सच्या या नव्या वादानंतर द काश्मीर फाईल्स ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे.  अनेक जण याविषयी टीका करतय तर कोणी सपोर्ट करताना दिसत आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News