अनुपम खेर साकारणार मनमोहन सिंग

अनुपम खेर साकारणार मनमोहन सिंग

त्यांच्या पहिल्या पाच वर्षाच्या कारकीर्दीवर संजय बारुंनी 'द अॅक्सिडेंटल पीएम' हे पुस्तक लिहिलंय. आणि या पुस्तकावर आधारित चित्रपट येतोय.

  • Share this:

06 जून : मनमोहन  सिंग हे जवाहरलाल नेहरू, इंदिरा  गांधींनंतर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारे  भारताचे पंतप्रधान. जितके वादग्रस्त तितकेच सन्माननीय. 2004 साली ते पंतप्रधान होतील असं कुणाच्या गावीही नव्हतं.ते पंतप्रधान  झाले तेही एका अपघाताने.त्यांच्या पहिल्या पाच वर्षाच्या कारकीर्दीवर संजय बारुंनी 'द अॅक्सिडेंटल पीएम' हे पुस्तक लिहिलंय. आणि या पुस्तकावर आधारित  चित्रपट येतोय ज्यामध्ये अनुपम खेर मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत दिसणारेत.

अनुपम खेरांना ही भूमिका चॅलेंजिंग वाटते. ते म्हणतात, 'एका समकालीन नेत्याला पडद्यावर साकारणं  कठीण असतं, कारण लगेच तुलना होते. मी ही भूमिका साकारण्यास उत्सुक आहे. हा चित्रपट एक पॉलिटिकल ड्रामा असेल. हा चित्रपट 1980च्या आॅस्कर विजेत्या 'गांधी'हून ही भव्य-दिव्य असेल.'

या सिनेमाचं  दिग्दर्शन विजय गुट्टे  करत आहेत. त्यांची ही डेब्यू फिल्म असेल. हा चित्रपट 2018 डिसेंबरमध्ये रिलीज होईल.याचा फर्स्ट लुक  रिलीज झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2017 05:28 PM IST

ताज्या बातम्या