जगभरातील 'टकल्यांना' अनुपम खेर यांनी समर्पित केलं हे गाणं, VIDEO पाहून हसू नाही आवरणार

जगभरातील 'टकल्यांना' अनुपम खेर यांनी समर्पित केलं हे गाणं, VIDEO पाहून हसू नाही आवरणार

काही चित्रपट आल्यानंतर आता टक्कल असणाऱ्या व्यक्तींसाठी आता एक नवीन गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्वत:ला टक्कल असणाऱ्या एका अभिनेत्यानेच शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 2 मार्च : टक्कल पडणं ही आरोग्याबाबतीतील एक महत्त्वाची समस्या आहे. अनेकांना या समस्येने ग्रासलं आहे. अगदी 35-36 वयामध्येच टक्कल पडू लागल्याने अनेकजण त्रस्त आहेत.  ‘बाला’, ‘उजडा चमन’ या चित्रपटांमधूनही टकलेपणाची समस्या मांडण्यात आली आहे. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मात्र टक्कल पडल्याचा आपल्याला त्रास होतो, असं कुणी खुलेआम सांगत नाही.  चित्रपटांनंतर आता टक्कल असणाऱ्या व्यक्तींसाठी आता एक नवीन गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्वत:ला टक्कल असणाऱ्या एका अभिनेत्यानेच शेअर केला आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी टक्कल असण्याचा आपल्याला किती त्रास होतो हे मांडलं आहे. एक गाण गात त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ डोक्यावर केस नसणाऱ्या सर्वांना समर्पित केला आहे. ‘पूर्वीसारखं केसांनो परत उगवा’ असच त्यांनी या व्हिडीओतून मागणं केलं आहे. ‘ऐ मेरे बिछडे चमन को’ या गाण्याचं विडंबन खेर यांनी केलं आहे.

'ऐ मेरे बिछड़े बालों फिर से उग आओ', असं म्हणत त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. अनुपम खेर यांनी जरी आपली समस्या मांडली असली तरी हा व्हिडीओ पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत 74 हजार ट्विटर युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारोंनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.

First published: March 2, 2020, 2:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या