अनुप जलोटांच्या आईनं विचारलं, कोण आहे ती जसलीन?

अनुप जलोटांच्या आईनं विचारलं, कोण आहे ती जसलीन?

अनुप जलोटाही आपल्या आईला भेटायला गेले. त्यांची आई 85 वर्षांची आहे.

  • Share this:

मुंबई, 30 आॅक्टोबर : बिग बाॅसच्या घरातून स्पर्धक जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा पहिलं काम करतात ते घरच्यांना भेटणं. इतके आठवडे फोन, इंटरनेट, टीव्ही आणि घर यांच्याशिवाय राहणं काही सोपं काम नाही. त्यामुळे बाहेर पडल्या पडल्या स्पर्धक पहिल्यांदा जातात घरी.

अनुप जलोटाही आपल्या आईला भेटायला गेले. त्यांची आई 85 वर्षांची आहे. जलोटांना तिनं पहिला प्रश्न काय विचारला असेल? तू कसा आहेस बाबा, कसं वाटलं वगैरे प्रश्न तिच्यासाठी गौण होते. तिनं विचारलं, कोण आहे ती जसलीन?

एका मुलाखतीत अनुप जलोटांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, ' जसलीन आणि माझं नातं शारीरिक नाही. ते अाध्यात्मिक आहे. ते पवित्र आणि संगीतमय आहे. ती माझी फक्त विद्यार्थिनी आहे.'

अनुप जलोटा म्हणाले, 'मला जसलीननं सांगितलं की तिला बिग बाॅसची आॅफर आलीय. पण तिला विचित्र जोडी बनून जायचंय. तिनं मला तिच्या बरोबर यायला सांगितलं. पण माझे म्युझिक शोज असल्यानं मी नकार दिला.' पुढे तेच म्हणाले की जसलीनच्या वडिलांनी त्या दोघांना म्युझिकल जोडी म्हणून जायला सांगितलं. त्यानंतर दोघंही जोडी म्हणून प्रसिद्ध झाले.

जसलीन मूळची मुंबईची आहे. तिचे वडील दिग्दर्शक आहेत. 28 वर्षांच्या जसलीने वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी संगीत शिकण्यास सुरूवात केली आणि वयाच्या 16व्या वर्षी तिने आंतर-महाविद्यालयीन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला गायिकेचा पुरस्कार पटकावला होता.

तिनं डान्समध्ये क्लासिकल भरतनाट्यम आणि वेस्टर्नमध्ये हिप-हॉप, साल्सा आणि बेली डान्सिंग ट्रेनिंग घेतलंय. त्याचबरोबर तिनं याआधी गायक मिक्का सिंग, सुखविंदर सिंग, पॅपॉन आणि अमजद खान यासारख्या दिग्गजांसोबत तीन वर्ष जगभरात परफॉर्म केलंय.

अखेर राकेश शर्मांची भूमिका करणार 'हा' सुपरस्टार

First published: October 30, 2018, 2:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading