Big Boss 12 : जसलीनसोबतच्या नात्याबद्दल जलोटांच्या पहिल्या पत्नीनं व्यक्त केलं मत

अनुप जलोटांच्या आयुष्यातल्या कधी काळी महत्त्वाच्या असलेल्या एका व्यक्तीनं यावर प्रतिक्रिया दिलीय.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2018 09:30 AM IST

Big Boss 12 : जसलीनसोबतच्या नात्याबद्दल जलोटांच्या पहिल्या पत्नीनं व्यक्त केलं मत

मुंबई, 25 सप्टेंबर : बिग बाॅस 12मध्ये अनुप जलोटा आणि जसलीनच्या रिलेशनशिपवर गरमागरम चर्चा सुरू आहे. काहींना हे योग्य वाटतंय, काहींना यात पब्लिसिटी स्टंट वाटतोय, तर काहींना अजून संभ्रम आहे. पण अनुप जलोटांच्या आयुष्यातल्या कधी काळी महत्त्वाच्या असलेल्या एका व्यक्तीनं यावर प्रतिक्रिया दिलीय.

सोनाली राठोड अनुप जलोटांची पहिली पत्नी. त्यांना याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, ' मी यावर का बरं विचार करू? माझा काय संबंध? मी तर खूप पुढे निघून आलीय.'

गायिका सोनाली राठोड गायक रूपकुमार राठोडच्या पत्नी आहेत. दोघांनी मिळून सिनेमासाठी खूप गाणी गायलीयत.

जसलीनच्या वडिलांनी त्यांना या नात्याबद्दल यापूर्वी काहीही माहित नव्हतं. ‘मला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की, गुरू शिष्याच्या स्वरूपात दोघं बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. तिथे ते रियाज करतील आणि गाणी गातील. दोघांच्या नात्याबद्दल जेव्हा कळलं तेव्हापासून संपूर्ण कुटुंबीय धक्क्यात आहेत.’

पुढे ते म्हणाले की, ‘हे माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अविश्वसनीय होतं. त्या दोघांनी प्रेमाची संमती देता आमच्या घरात एकप्रकारची शांतता पसरली. सर्वच काळजीत पडले. १० मिनिटांच्या आत नातेवाईकांचे फोन यायला सुरूवात झाली. घरातले वातावरण एका क्षणात बदलले.’

Loading...

अनुप आणि जसलीन यांची ओळख कशी झाली या प्रश्नाचं उत्तर देताना केसर म्हणाले की, ‘मी गेल्या अनेक वर्षांपासून अनूप यांना ओळखतो. अनूपजी, जगजीतजी यांच्यासोबत मी काम केलं आहे. अनुपजी यांना मीच माझ्या कुटुंबियांशी भेटवले होते. गेल्या तीन- चार वर्षांपासून जसलीन अनुप यांच्याकडे संगीताची तालीम घेतेय. कधी ते आमच्या घरी शिकवायला यायचे तर कधी जसलीन त्यांच्या घरी जायची. या दोघांमध्ये असे काही चालत असेल याचा घरातल्यांना संशयही आला नाही.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2018 09:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...