मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

संगीतकार श्रवण राठोड पाठोपाठ चित्रपट क्षेत्राला आणखी एक धक्का; 'या' दिग्गज कलाकाराचा कोरोनामुळे मृत्यू

संगीतकार श्रवण राठोड पाठोपाठ चित्रपट क्षेत्राला आणखी एक धक्का; 'या' दिग्गज कलाकाराचा कोरोनामुळे मृत्यू

त्यांनी अॅमेजॉन प्राइम व्हिडीओवर वेब सीरीज 'मेड इन हेवेन' (Made In Heaven) मध्येही काम केलं आहे

त्यांनी अॅमेजॉन प्राइम व्हिडीओवर वेब सीरीज 'मेड इन हेवेन' (Made In Heaven) मध्येही काम केलं आहे

त्यांनी अॅमेजॉन प्राइम व्हिडीओवर वेब सीरीज 'मेड इन हेवेन' (Made In Heaven) मध्येही काम केलं आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 24 एप्रिल : कोरोना महासाथीदरम्यान देशात दररोज अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट क्षेत्रातून कोणा ना कोणाच्या निधनाची बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेता आणि चित्रपट निर्माते ललित बहल (Lalit Behl) यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे.

मुलाने दिली माहिती

ललित बहल (Lalit Behl) यांचा मुलगा कनु बहल यांनी वडिलांच्या निधनाची माहिती दिली. कनु म्हणाले की, शुक्रवारी दुपारी त्यांचं निधन झालं. त्यांना हृदयसंबंधित आजार होता आणि त्यात कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यांच्या फुप्फुसात संसर्ग झाला होता, दुर्देवी म्हणजे हा संसर्ग गंभीर पातळीपर्यंत पोहोचला होता. त्यांना आरोग्यासंबंधित आजार असल्याने त्यांना अधिक त्रास सहन करावा लागला.

हे ही वाचा- थोडी तरी लाज बाळगा' मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेणाऱ्यांवर भडकला नवाझुद्दिन

ललित बहल (Lalit Behl) यांचं थिएटरसोबत जवळचं नातं होतं. त्यांनी दूरदर्शनमधील अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. त्यांनी 'तपिश' (Tapish), 'आतिश' (Aatish) आणि 'सुनहरी जिल्द' (Sunehri Jild) ची निर्मिती केली आहे. याशिवाय त्यांनी 'अफसाने' (Afsaane) मालिकेत अभियनही केला होता.

वेब सीरिजमध्येही केलंय काम

ललित बहल (Lalit Behl) चित्रपट 'तितली' आणि 'मुक्ति भवन' (Mukti Bhawan) मध्ये पाहायला मिळाले होते. 'तितली' चं निर्देशन त्यांच्या मुलाने केलं होतं. ललित यांनी अॅमेजॉन प्राइम व्हिडीओवर वेब सीरीज 'मेड इन हेवेन' (Made In Heaven) मध्येही काम केलं आहे. 2019 मध्ये त्यांचा चित्रपट 'जजमेंटल है क्या' रिलीज झाला होता.

First published:

Tags: Bollywood, Corona patient, Covid-19 positive