Home /News /entertainment /

मलंग सिनेमाचं हॉट पोस्टर रिलीज, दिशाने खांद्यावर बसून आदित्यला केलं लिपलॉक KISS

मलंग सिनेमाचं हॉट पोस्टर रिलीज, दिशाने खांद्यावर बसून आदित्यला केलं लिपलॉक KISS

दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर यांची सिझलिंग केमिस्ट्री असणारा मलंग हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

    मुंबई, 04 जानेवारी : दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर यांची सिझलिंग केमिस्ट्री असणारा मलंग हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मलंग चित्रपटाचा ट्रेलर 6 जानेवारीला रिलीज होणार आहे. तर, हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. दरम्यान आज या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. या पोस्टरमध्ये दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूरला किस करताना दिसत आहे. मलंग सिनेमासाठी दिशा आणि आदित्य यांनी खुप मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी दोघांनी अंडर वॉटर किसिंग सीनचे ट्रेनिंगही घेतले होते. एवढेच नाही तर या चित्रपटाच्या एका दृश्यासाठी दिशा आणि आदित्य यांना एक मिनिटला पाण्याखाली रहावे लागले होते. वाचा-नेहा पेंडसेच्या घरी सुरू झाली लगीनघाई, पाहा संगीत सेरेमनीचे PHOTO यापूर्वीही चित्रपटाची अनेक पोस्टर्स प्रसिद्ध झाली आहेत. एका पोस्टरमध्ये आदित्य चिडलेला दिसत आहे. आदित्यने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, 'प्रेमाप्रमाणेच प्रेमाचा द्वेषही पवित्र आहे’. दरम्यान सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये दिशा पाटणीही शानदार अंदाजात दिसत आहे. वाचा-सलमान खान Bigg Boss सोडणार? सदस्यांच्या बेताल वागण्यामुळे चढला भाईजानचा पारा
    वाचा-दोन मुलांची आई श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात, दोन वेळा झालाय काडीमोड कधी होणार ट्रेलर रिलीज? चित्रपटाचा ट्रेलर 6 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मोहित सूरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी एकत्र केली आहे. या चित्रपटात आदित्य, दिशाशिवाय अनिल कपूर आणि कुणाल खेमूसुद्धा आहेत. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात अनिल कपूर पोलिसांच्या भूमिकेत असू शकतात अशी बातमी आहे. काही दिवसांपूर्वी अनिल कपूरचा एक फोटो व्हायरल झाला होता.या फोटोत अनिल पोलीसांच्या वेशात दिसला होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या