मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Annu Kapoor: अभिनेते अन्नू कपूर यांना रुग्णालयात केले दाखल, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट आली समोर

Annu Kapoor: अभिनेते अन्नू कपूर यांना रुग्णालयात केले दाखल, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट आली समोर

अन्नू कपूर

अन्नू कपूर

सिनेसृष्टीतून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यांना आज सकाळी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 26 जानेवारी- सिनेसृष्टीतून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यांना आज सकाळी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर गंगाराम हॉस्पिटलचे डॉ. अजय स्वरूप (चेअरमन बोर्ड) यांच्या म्हणण्यानुसार अन्नू कपूर यांना छातीत त्रास होत असल्याने त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कार्डिओलॉजी विभागातील डॉ. सुशांत वट्टल यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.

आजतकच्या रिपोर्टनुसार अभिनेते अन्नू कपूर यांचे मॅनेजर सचिन यांनी संपर्क साधत सांगितलं आहे की, अन्नू कपूर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. त्यांना आज सकाळी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी जेवणसुद्धा केलं आहे. त्यांच्या तब्येतीत सकारात्मक सुधारणा होत असल्याचंही मॅनेजरने सांगितलं आहे.

अन्नू कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. ते नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत असतात. शिवाय गेली अनेक वर्षे ते छोट्या पडद्यावरही काम करत आहेत. अन्नू कपूर नेहमीच आपल्या स्पष्ट आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. ते नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत ठामपणे मांडत असतात. त्यांना रोखठोक बोलण्यासाठी ओळखलं जातं .

(हे वाचा: Shaheer Sheikh: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याच्या बिल्डिंगमध्ये भीषण आग;पत्नीसह अडकली सोळा महिन्यांची लेक )

अन्नू कपूर यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक स्टेज आर्टिस्टच्या रुपात केली होती. अवघ्या 22 व्या वर्षी त्यांनी 70 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारत आपली अनोखी छाप पाडली आहे. त्यांच्या या भूमिकेने दिग्दर्शक शयाम बेनेगल इतके प्रभावी झाले होते की त्यांनी अन्नू कपूर यांना पत्र लिहलं होतं. अन्नू कपूर यांना प्रतिभावान अभिनेते म्हणून पाहिलं जातं. अन्नू कपूर यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येताच चाहते चिंतेत आहेत. सर्वजण त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

First published:

Tags: Bollywood, Entertainment