नवी दिल्ली, 20 जानेवारी: साऊथ सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कन्नड चित्रपट निर्माते प्रदीप राज (Kannada Filmmaker Pradeep Raj) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास चित्रपट दिग्दर्शकाने अखेरचा श्वास घेतला. प्रदीप राज यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान प्रदीप राज यांचा मृत्यू (Kannada Filmmaker Pradeep Raj Passed Away) झाला. प्रदीप राज यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
चित्रपट निर्माते प्रदीप राज यांच्यावर आज पुद्दुचेरीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रदीप राज यांनी त्यांच्या दिग्दर्शन करिअरमध्ये लोकप्रिय आणि हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘गिरगटले’ ‘किराताका’ ‘होटी उरिवा किच्चिनल्ली’ यासारखे सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या वाढीसाठी, चांगल्या सिनेमांच्या निर्मितीत त्यांचं मोलाचं योगदान राहिले.
दक्षिणेतील अभिनेता यशसोबत एकहून एक हिट सिनेमे दिले. ‘किराताका’ या तमिळ चित्रपटाचा त्यांनी रिमेक केला. ‘किराताका’ या सिनेमांनी अनेक नावाजलेले पुरस्कार आपल्या नावे केले. प्रदीप यांचा ‘किच्चू’ हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित झाला. हा सिनेमाही चांगलाच हिट झाला. या सिनेमातील अभिनेता ध्रुव शर्मा यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.