मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मी होणार सुपरस्टार! अंकुश चौधरीचं 15 वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन

मी होणार सुपरस्टार! अंकुश चौधरीचं 15 वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन

स्टार प्रवाहवर 21 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ (Mi Honar Superstar) या डान्स रिअॅलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 1 ऑगस्ट: अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये झळकणारा अंकुश गेली 15 वर्ष मालिकांमध्ये झळकलेला नाही. परंतु प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता तो लवकरच छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे. स्टार प्रवाहवर 21 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ (Mi Honar Superstar) या डान्स रिअॅलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे.

स्टार प्रवाहने अलिकडेच या नव्या शोचा ट्रेलर लॉन्च केला. (Dance show) नृत्याचे वेगवेगळे प्रकार हटके पद्धतीने या शोमध्ये दाखवले जाणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा नक्कीच प्रचंड अटीतटीची असणार आहे. या स्पर्धकांमधून सुपरस्टार निवडण्याची मोठी जबाबदारी अंकुश चौधरीच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.

‘पुरुषांच्या चुकीसाठी महिला दोषी नसतात’; रिचा चड्ढाचा शिल्पा शेट्टीला पाठिंबा

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अर्जुन-जान्हवीच्या नात्यात का होता दुरावा? 15 वर्ष केलं नव्हतं संभाषण

‘मी होणार सुपरस्टार’ या रिअलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, “पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन.”

First published:

Tags: Comedy actor, Dance video