मुंबई 20 मे: अभिनेता अंकुश चौधरीचा (Ankush Choudhary) ‘ती सध्या काय करतेय?’ (Ti Saddhya Kay Karte) हा चित्रपट तुफान गाजला होता. मैत्री आणि पहिलं प्रेम याभोवती फिरणाऱ्या या चित्रपटानं तरुणांच्या मनावर अक्षरश: गारुड घातलं होतं. शिवाय यामधील गाणी देखील लोकप्रिय झाली होती. मात्र याच चित्रपटाचा पुढचा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय अशी घोषणा स्वत: अंकुशनं केली आहे. या चित्रपटाचं नाव ‘ती सध्या कुठे मिळते?’ असं असेल असं तो म्हणतोय.
अंकुश इतर सेलिब्रिटींप्रमाणे सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. मात्र जेव्हा कधी तो एखादी पोस्ट शेअर करतो तेव्हा सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. यावेळी देखील त्यानं अशीच एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. “आता कोरोना लसीवर नवा चित्रपट येतोय म्हणे...ती सध्या कुठे मिळते” अर्थात ही पोस्ट त्यानं केवळ गंमत म्हणून केली आहे. या चित्रपटाची अशी कुठलीही अधिकृत घोषणा त्यानं अद्याप केलेली नाही. मात्र त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायर होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कोरोना रुग्णांना सलमान देतोय मोफत ऑक्सिजन; मदत मिळवण्यासाठी या नंबरवर करा कॉल
View this post on Instagram
‘ती सध्या काय करतेय’ हा चित्रपट 2017 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अंकुशसोबतच तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचं तीन वर्षांपूर्वी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अनेकांनी सोशल मीडियावरील आपले स्टेटस देखील बदलले होते. याच पार्श्वभूमीवर अंकुशची ही नवी पोस्ट पाहून चित्रपटाचा सिक्वल खरोखरंच येतोय की काय? असा प्रश्न अनेकांना पडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actor, Entertainment