Home /News /entertainment /

Ankita Lokhande च्या संगीताला मराठमोळ्या अमृता-अभिज्ञाचा भन्नाट डान्स, Video Viral

Ankita Lokhande च्या संगीताला मराठमोळ्या अमृता-अभिज्ञाचा भन्नाट डान्स, Video Viral

अंकिता लोखंडे(Ankita Lokhande ) लवकरच बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत (Vicky Jain ) लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाचे विधी सुरु झाले आहेत.

  मुंबई, 12 डिसेंबर - बी टाउनमध्ये सध्या सनई चौघडेचेच सुर ऐकायला मिळत आहेत. अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)आणि अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) नंतर आता आणखी एक क्यूट कपल लग्नबेडीत अडकणार आहे. अंकिता लोखंडे(Ankita Lokhande ) लवकरच बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत (Vicky Jain ) लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. अंकिताची मेंदी सेरेमनी झाली आहे. नुकतेच अंकिताच्या संगीत सोहळ्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओ अंकितासोबत मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिज्ञा भावे उत्साहात डान्स करताना दिसत आहेत. राजश्री मराठीने त्यांच्या इन्स्टावर अंकिताच्या संगीत सोहळ्याचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये अंकितासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिज्ञा भावे फुलटू डान्स करताना दिसत आहेत. अंकिताने तर अमृतासोबत फुलऑन डान्स केला आहे. दुसरीकडे या संगीत सोहळ्या अभिज्ञाने देखील अमृतासोबत चांगलाच ठेका धरला आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
  अंकिता व विकी येत्या 14 डिसेंबरला लग्नबंधणार अडकणार आहेत. आज 13 तारखेला हळद आणि संगीत सेरेमनी आयोजित केली आहे. या लग्नात अंकिता व विकीचे काही जवळचे मित्र व कुटुंबीय सहभागी होणार आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाचे विधी गेल्या आठवड्यात सुरू झाले आहेत. वाचा : Ankita Lokhande च्या हातावर सजली विकीच्या नावाची मेहंदी; VIDEO व्हायरल अंकिता लोखंडेच्या मेंदी सोहळ्याचे फोटो समोर येताच आता तिचे चाहते तिला या नव्या प्रवासाच्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देत आहेत.यापूर्वी, अभिनेत्रीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अंकिता आणि विकीच्या प्री वेडिंग शूटचा हा व्हिडिओ होता.
  पारंपारिक ड्रेसमध्ये परिधान केलेल्या अंकिताची प्री-वेडिंग ग्लो पाहायला मिळत आहे. तिचं हसू लग्नापूर्वीच्या लुकमध्ये भर घालत आहे. दरम्यान, ढोल-ताशाच्या तालावर अंकिता जोरदार नाचत असल्याचे दिसत आहे. ती लग्नाच्या सर्व विधी एन्जॉय करताना दिसत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Ankita lokhande, Bollywood News, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या