टीका होत असताना अंकिता लोखंडेचा कंगनाला पाठिंबा; या एका शब्दात व्यक्त केलं समर्थन

टीका होत असताना अंकिता लोखंडेचा कंगनाला पाठिंबा; या एका शब्दात व्यक्त केलं समर्थन

मणिकर्णिका या चित्रपटामध्ये कंगना आणि अंकिताने एकत्र काम केले आहे

  • Share this:

मुंबई, 9 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतसाठी (Kangana Ranaut) बुधवारचा दिवस खूप अडचणींचा होता. पालिकेने कंगनाचे कार्यालय अवैध असल्याचे सांगत तोडले. त्यानंतर या प्रकरणात सोशल मीडियावर (Social Media) आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनेक सेलिब्रिटी पुढे येऊन कंगानाचे समर्थन करीत आहेत, तर अनेकांनी या प्रकरणात काहीही न बोलणं योग्य समजले. यादरम्यान कंगनाचा चित्रपट 'मणिकर्णिका' ची सहकलाकार अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने पुढे येऊन कंगनाला समर्थन दिलं आहे. अंकिताने कंगनाचा एक फोटो शेअर करीत तिच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे.

अंकिताने कंगना रनौतबाबत आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कंगनाचे एक खास फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो मणिकर्णिका या चित्रपटादरम्यानचा आहे. या फोटो झांशीची राणी या भूमिकेत कंगना दिसत आहे.

View this post on Instagram

BRAVEHEART ❤️ Exorbitant love & More Power to you 💪🏻 @kanganaranaut

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

कंगना रनौतचा फोटो पोस्ट करीत अंकिताने लिहिलं आहे की, - धाडसी...तुमच्यासाठी खूप प्रेम आणि तुम्हाला माझ्याकडून शक्ती..यासोबतच अंकिताने कंगनाला टॅगही केलं आहे. या एका विधानासाठी तिने कंगनासोबत असल्याचं सिद्ध केलं आहे.

दुसरीकडे कंगनाला गृह मंत्रालयाने Y प्लस दर्जाची सुरक्षा दिली होती. त्यात पालिकेने कंगनाच्या कार्यालयातील काही भाग अनधिकृत असल्याचे सांगून तो तोडला. यानंतर देशभरात नवं वादळ सुरू झालं आहे. आता या प्रकरणात नवी गोष्ट समोर आली आहे. पालिकेने कंगनासह तिच्या कार्यालयाच्या शेजारी प्रसिद्ध फॅशन डिजायनर मनीन मल्होत्रालाही नोटीस पाठवली होती. मात्र नोटीस दिल्यानंतर काही तासात त्यांनी कंगनाचे कार्यालय तोडले. तर मनीष मल्होत्राला 7 दिवसांची मुदत दिली, अशी माहिती समोर आली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 9, 2020, 9:27 PM IST

ताज्या बातम्या