मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नाची तारीख आली समोर; असा असणार कार्यक्रम

अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नाची तारीख आली समोर; असा असणार कार्यक्रम

Ankita Lokhande

Ankita Lokhande

पवित्र रिश्ता (Pavitra Rishta) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडेही (Ankita Lokhande) या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे.

मुंबई, 29 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये सध्या विकी कौशल आणि कतरिना कैफच्या (Katrina and Vicky wedding) लग्नाची चर्चा सुरू आहे. मात्र, या धामधुमीत आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचं समजतं आहे. पवित्र रिश्ता (Pavitra Rishta) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडेही (Ankita Lokhande) या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. नुकतीच तिने आपल्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी (Ankita Lokahande bachelor party) केली होती. त्यानंतरच तिचं लग्न लवकरच होणार असल्याचं समजलं होतं. अंकिताच्या लग्नाची तारीखही (Ankita Lokhande marriage date) स्पष्ट झाली आहे.

'ई-टाइम्स'च्या एका रिपोर्टनुसार, अंकिता तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्न करणार आहे. विकी आणि अंकिता गेल्या कित्येक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये (Ankita Lokhande boyfriend) आहेत. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 12 ते 14 डिसेंबर यादरम्यान हे लग्न होणार आहे. हळदीचा कार्यक्रम, संगीत कार्यक्रम आणि लग्नाचे विधी या तीन दिवसांमध्ये होणार आहेत. मुंबईमध्ये होणाऱ्या या लग्नाचं आमंत्रण (Ankita Vicky wedding) बऱ्याच मोठमोठ्या सेलेब्रिटींना, तसंच या दोघांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवण्यात आलं आहे.

असं असणार तीन दिवसांचं शेड्यूल

12 डिसेंबरला सकाळी मेंदी समारंभ असेल, त्याच दिवशी संध्याकाळी साखरपुडा (Ankita Lokhande marriage ceremony schedule) पार पडणार आहे. त्यानंतर 13 तारखेला हळदीचा कार्यक्रम आणि सायंकाळी संगीत मैफल असणार आहे. यानंतर 14 तारखेला सकाळी लग्नाचे विधी पार पडतील आणि सायंकाळी रिसेप्शन असणार आहे. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमांसाठी विविध थीम्स (Ankita Lokhande marriage themes) असणार आहेत. मेंदी समारंभासाठी ब्राइट पॉप, तर साखरपुड्यासाठी ग्लिट्स अँड ग्लॅम अशी थीम ठेवण्यात आली आहे. हळदीसाठी येलो आणि संगीत मैफलीसाठी इंडो-वेस्टर्न अशा थीम असणार आहेत. येणाऱ्या पाहुण्यांना या थीमनुसार पेहराव निवडावा लागणार आहे.

पवित्र रिश्ता मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये अंकिता, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) होती. यानंतर या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये ती शहीर शेखसोबत होती. मणिकर्णिका चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मुख्य अभिनेत्री म्हणून ती बाघी 3 (Baaghi 3) या चित्रपटात झळकली होती. याव्यतिरिक्त अंकिता ‘झलक दिखला जा 4,’ ‘बिग बॉस 13,’ ‘शक्ती’ आणि ‘सपने सुहाने लडकपन के’ अशा मालिकांमध्येही दिसून आली आहे.

First published:
top videos

    Tags: Ankita lokhande, Entertainment