मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ankita Lokhande ने लग्नासाठी निवडला होता हा खास लेहेंगा! मनीष मल्होत्राने केला होता डिझाईन

Ankita Lokhande ने लग्नासाठी निवडला होता हा खास लेहेंगा! मनीष मल्होत्राने केला होता डिझाईन

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेचा  (Ankita Lokhande Wedding)  काल थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. अंकिता लॉन्गटाईम बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नाच्याबेडीत अडकली.

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande Wedding) काल थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. अंकिता लॉन्गटाईम बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नाच्याबेडीत अडकली.

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande Wedding) काल थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. अंकिता लॉन्गटाईम बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नाच्याबेडीत अडकली.

मुंबई,15 डिसेंबर-  टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेचा  (Ankita Lokhande Wedding)  काल थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. अंकिता लॉन्गटाईम बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नाच्याबेडीत अडकली. लग्नामध्ये अभिनेत्री एखाद्या सुंदर राजकुमारी दिसत होती. तसेच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, या नवरीच्या लेहेंग्याकडे.अभिनेत्रीने गोल्डन कलरचा लेहेंगा परिधान केला होता. अंकिता लोखंडेचा हा लेहेंगा फारच खास होता.

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा वेडिंग लूक सध्या चर्चेत आला आहे. अभिनेत्रीने आपल्या लग्नसाठी गोल्डन कलरचा सीक्वेन्स्ड लेहेंगा निवडला होता. या घेरदार लेहेंग्यामध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत होती. तसेच अंकिताने आपल्या पोशाखाला मॅचिंग असे दागिने घातले होते. अभिनेत्रीने डोक्यावर घेतलेल्या गोल्डन कलरच्या पदराने तिच्या लूकला एक शाही टच दिला होता. अभिनेत्रीने या पोशाखात लग्नमंडपात एन्ट्री करताच सर्वांच्या नजर तिच्यावर खिळल्या होत्या. कारण अंकिता एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती. हा खास लेहेंगा प्रसिद्ध सेलेब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रा   (Manish Malhotra)   यांनी डिझाईन केला होता.सध्या सोशल मीडियावर अंकिताच्या वेडिंग लूकची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्रीने आपल्या लूकला महाराष्ट्रीयन टच देण्यासाठी आपल्या हातात ड्रेसला मॅचिंग बांगड्यांसोबतच आवर्जून हिरवा चुडासुद्धा घातला होता.

गेली चार दिवस अंकिता लोखंडे आणि विकी जैन यानाच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु होते. अभिनेत्रीने आपल्या लग्नाआधीच्या प्रत्येक क्षणाचा मनमुरादपणे आनंद लुटला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रींच्या मुहूर्तमेढपासून ते हळदी आणि मेहंदी पर्यंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटो आणि व्हिडीओमध्ये अंकिता आणि विकी आपल्या मित्रांसोबत मोठी धम्माल करताना दिसून आले होते. या प्रत्येक कार्यक्रमात अंकिताची खास मैत्रीण आणि मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. तसेच अंकितासोबत पवित्र रिश्ता २ मध्ये काम करत असलेली अभिनेता अभिज्ञा भावेसुद्धा अभिनेत्रीच्या या खास प्रसंगी सहभागी झाली होती. तर तिच्या संगीत सेरेमनीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने धम्माल केली होती.

अंकिता लोखंडेने बिलासपूर येथील कोळसा उद्योजकाचा मुलगा विक्की जैनसोबत लग्न केले आहे. विकी हा देखील व्यावसायिक असून व्यवसायानिमित्त तो बहुतांश वेळ मुंबईत राहतो. व्यवसायाच्या संदर्भात त्याची अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत ओळख झाली होती. भेटीगाठी आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

First published:

Tags: Ankita lokhande, Entertainment