मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: अंकिता लोखंडे-विकी जैनने केलं प्री-वेडिंग सेलिब्रेशन; अभिनेत्रीने होणाऱ्या पतीसोबत केला जबरदस्त डान्स

VIDEO: अंकिता लोखंडे-विकी जैनने केलं प्री-वेडिंग सेलिब्रेशन; अभिनेत्रीने होणाऱ्या पतीसोबत केला जबरदस्त डान्स

अंकिता लोखंडे   (Ankita Lokhande)   लवकरच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत   (Vicky jain)  लग्नगाठ बांधणार आहे. ती तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. अंकितासाठी डिसेंबर महिना आणखी खास असणार आहे.

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लवकरच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत (Vicky jain) लग्नगाठ बांधणार आहे. ती तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. अंकितासाठी डिसेंबर महिना आणखी खास असणार आहे.

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लवकरच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत (Vicky jain) लग्नगाठ बांधणार आहे. ती तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. अंकितासाठी डिसेंबर महिना आणखी खास असणार आहे.

मुंबई, 1 डिसेंबर-   अंकिता लोखंडे   (Ankita Lokhande)   लवकरच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत   (Vicky jain)  लग्नगाठ बांधणार आहे. ती तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. अंकितासाठी डिसेंबर महिना आणखी खास असणार आहे. अंकिता आणि विकीने डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी जवळच्या मित्रांसोबत प्री-वेडिंग सेलिब्रेशन   (Pre-Wedding Celebration)   केले आहे. अंकिताचा वाढदिवसही डिसेंबरमध्ये येतो. अंकिताच्या वाढदिवसाआधी दोघेही लग्न करणार आहेत.

अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये ती विकी जैन आणि तिच्या जवळच्या मित्रांसोबत प्री-वेडिंग सेलिब्रेशन करताना दिसून येत आहे. अंकिता तिच्या मैत्रिणी आणि विकीसोबत डान्स करताना दिसत आहे. प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी, अंकिताने फ्लोरल हेअरस्टाइलसह गोल्डन शिमरी लेसची साडी नेसली होती. तर विकीने पेस्टल शेड, मोहक बंदगळा आणि ट्राउझर घातले होते.

अंकिता लोखंडेने तिची मैत्रिण पूर्वा राणासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता आनंदाने ओरडताना दिसत आहे. पूर्वा त्याच्या गालावर किस करताना दिसत आहे. आणि मागे जोरात संगीत वाजत आहे. अंकिताने या व्हिडिओवर 'टू बी ब्राइड' असंही लिहिलं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये अंकिता सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. आणि विकी जैन तिच्या मागे उभा आहे. मग 'सौदा खरा खरा' हे सॉन्ग वाजते आणि दोघेही नाचू लागतात. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अंकिताने लिहिले आहे, 'with My sweetheart'.

अंकिता लोखंडेने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती विकी जैनसोबत स्टेप बाय स्टेप डान्स करत आहे. यामध्ये दोघेही उत्तम डान्सिंग मूव्ह दाखवत आहेत. हे दोघेही शाहरुख खानच्या 'जालिमा' या रोमँटिक गाण्यावर परफॉर्म करत आहेत. दुसर्‍या व्हिडिओमध्ये अंकिता आणि विकी मित्रासोबत डान्स करताना दिसत आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये प्री वेडिंग सेलिब्रेशन असेही लिहिलेले आहे.

(हे वाचा:गँग्स ऑफ वासेपुर' फेम अभिनेत्याने मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ)

अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढू लागली आहे. एक दिवसापूर्वी अंकिता आणि विकीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही त्यांच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडले होते.अंकिता आणि विकीचे लग्न तीन दिवस चालणार आहे जे 12 डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि 14 डिसेंबरला संपणार आहे. त्यांच्या या मोठ्या दिवसासाठी, दोघांनी मुंबईतील एक 5-स्टार हॉटेल निवडले आहे. अंकिता तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या चाहत्यांना लग्नाच्या तयारीची झलक दाखवत असते.

First published:
top videos

    Tags: Ankita lokhande, Entertainment