मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतच्या गाण्यावर घातली एंगेजमेंट रिंग! VIDEO होतोय VIRAL

अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतच्या गाण्यावर घातली एंगेजमेंट रिंग! VIDEO होतोय VIRAL

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नानंतर आता सर्वांच लक्ष टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokande)  आणि विकी जैनच्या   (Vicky Jain)  लग्नाकडे लागलं आहे. हे दोघे येत्या १४ डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहेत.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नानंतर आता सर्वांच लक्ष टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokande) आणि विकी जैनच्या (Vicky Jain) लग्नाकडे लागलं आहे. हे दोघे येत्या १४ डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहेत.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नानंतर आता सर्वांच लक्ष टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokande) आणि विकी जैनच्या (Vicky Jain) लग्नाकडे लागलं आहे. हे दोघे येत्या १४ डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहेत.

मुंबई, 14 डिसेंबर-    कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नानंतर आता सर्वांच लक्ष टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokande)  आणि विकी जैनच्या   (Vicky Jain)  लग्नाकडे लागलं आहे. हे दोघे येत्या १४ डिसेंबरला लग्नगाठ बांधणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. हळदी, मेहंदीनंतर आता दोघांनी संगीत नाईटमध्येसुद्धा धम्माल केली आहे. इतकंच नव्हे तर दरम्यान विकीने अंकिताला साखरपुड्याची अंगठीसुद्धा घातली आणि यावेळी दिवंगत अभिनेता आणि अंकिताचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतचं   (Sushant Singh Rajput)  गाणं बॅकग्राउंडला वाजत होतं.

पापाराझी विरल भयानीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अंकिता आणि विकी एकमेकांना साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहेत. विकीने अंकिताला अंगठी घातली तेव्हा अभिनेत्रीचा आनंद गगनात मावत नव्हता. यानंतर अंकिताने विकीला मिठी मारत आपला आनंद व्यक्त केला.त्यांनतर अंकिताने विकीला अंगठी घालत साखरपुड्याच्या कार्यक्रम पूर्ण केला. नंतर दोघांनी हात उंचावून सर्वांना आपल्या हातातील अंगठ्या दाखवत हा आनंद सर्वांसोबत शेअर केला. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अंकिताचे चाहते हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

नुकताच पार पडलेल्या मेहंदीच्या कार्यक्रमात अंकिताच्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढण्यात आली आहे. ही मेहंदी लोकप्रिय आर्टिस्ट वीणा नागदा यांनी काढली आहे. विशेष म्हणजे त्यांनी नुकताच अभिनेत्री कतरिना कैफच्यासुद्धा हातावर मेहंदी काढली होती. तसेच आपल्या मेहंदी आणि हळदी समारंभात अंकिताने विकी जैन आणि आपल्या जवळच्या मैत्रिणी अमृता, अभिज्ञा, अपर्णा आणि आरतीसोबत फुल्ल ऑन धम्माल केली होती. हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

(हे वाचा:लग्न झालं असताना देखील या अभिनेत्रीने सलमानला घातली लग्नाची मागणी )

अंकिता आणि विकी मुंबईच्या ग्रँड हयात या प्रसिद्ध हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. तसेच दोघे १४ डिसेंबरला म्हणजेच लग्नादिवशीच रात्री आपल्या सेलेब्रेटी मित्रांसाठी मोठ्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिता आणि विकीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या प्री-वेडिंगचा एक व्हिडीओ पसोट केला होता. चाहते त्यांच्या लग्नासाठी फारच उत्सुक आहेत.

First published:

Tags: Ankita lokhande, Entertainment