‘सुशांतचा वापर केवळ प्रसिद्धीसाठी केलास’; बिकिनी फोटोशूटमुळं अंकिता लोखंडे होतेय ट्रोल

‘सुशांतचा वापर केवळ प्रसिद्धीसाठी केलास’; बिकिनी फोटोशूटमुळं अंकिता लोखंडे होतेय ट्रोल

अंकितानं इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले. मात्र हे फोटो पाहून काही नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. “नशीब तुझं हे रुप सुशांतनं पाहिलं नाही”, असं म्हणत तिला काही जाणांनी ट्रोल देखील केलं आहे.

  • Share this:

अंकिंता लोखंडे ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. व्हायरल होणारे ट्विट्स, इन्स्टाग्राम पोस्ट, व्हिडीओ, फोटोज यामुळे ती कायम चर्चेत असते. अलिकडेच तिनं इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले. मात्र हे फोटो पाहून काही नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. “नशीब तुझं हे रुप सुशांतनं पाहिलं नाही”, असं म्हणत तिला काही जाणांनी ट्रोल देखील केलं आहे.

अंकितानं काळ्या रंगाची बिकिनी परिधान करुन स्वमिंग पूलमध्ये एक बोल्ड फोटोशूट केलं. हे फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. मात्र तिचे हे फोटो काही नेटकऱ्यांना आवडले नाहीत. परिणामी त्यांनी अंकितावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. “सुशांतच्या नावाखाली तू खूप प्रसिद्धी मिळवलीस. परंतु तरीही तुझ्याकडे काहीच काम नाही. म्हणून तू दिवसभर असे फोटो शेअर करताना दिसतेस.” अशा आशयाचे कॉमेंट्स करुन तिला ट्रोल केलं जात आहे. अर्थात यावर अंकिताने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अवश्य पाहा - ‘तुझी आई करते तरी काय?’; बिग बींची नात ट्रोलर्सवर संतापली

अंकितावर का संतापले नेटकरी?

अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड होती. सुशांतच्या मृत्यूसाठी तिने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जबाबदार धरलं होतं. सोशल मीडियाद्वारे ती वारंवार रियाच्या जीवनशैलीवर टीका करत होती. परंतु आता ती देखील सोशल मीडियावर आनंदी असतानाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आहे. या पार्श्वभूमीवर तिच्या या पोस्ट काही सुशांतच्या चाहत्यांना आवडल्या नाहीत. परिणामी तिच्यावर आता टीका केली जात आहे.

Published by: Mandar Gurav
First published: February 17, 2021, 2:11 PM IST

ताज्या बातम्या