मुंबई, 16 डिसेंबर : अंकिता लोखंडे (Ankita LoKhande) सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती नव-नवे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते. आताही तिचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. यात ती हनी सिंगच्या फर्स्ट किस (First Kiss) या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर अंकिताचा बरंच फॅन फॉलोईंग आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. ‘तू सुशांतला विसरलीस का?, ही वेडी झाली आहे का? अशा प्रकारच्या कॉमेट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. काहींनी तर तिच्या व्हिडीओवर कॉमेंट बॉक्समध्ये डिसलाईकचा थंब पोस्ट केला आहे. तर काही चाहत्यांनी तिच्या व्हिडीओची स्तुतीदेखील केली आहे. याआधीदेखील अंकिताला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं.
सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर जवळजवळ 40 दिवस अंकिता लोखंडे सोशल मीडियापासून दूर होती. सुशांत आणि अंकिता जवळजवळ 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं होतं. जून 2020 मध्ये सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतला न्याय मिळावा याकरता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कॅम्पेन राबण्यात आलं होतं. अंकिता लोखंडे हिने देखील चाहत्यांची साथ देत सुशांतला न्याय देण्याची मागणी केली होती. सध्या अंकिता विकी जैनसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अंकिताने विकी जैनसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावरुनही अंकिताला अनेकांनी ट्रोल केलं होतं. अंकिता विकी जैनशी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.