मुंबई, 22 मार्च : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) खूप ट्रोल केलं आहे. अनेकदा सोशल मीडियावर अंकिताच्या पोस्टवर अभिनेत्याचे चाहते तिला बरं-वाईट म्हणतात. अनेकदा तर दोघांच्या ब्रेकअपसाठी अंकिताला ब्लेम केलं जातं. आता अंकिताने एका मुलाखतीत याबाबत मोठा खुलासा केला आहे. याशिवाय तिने ब्रेकअपबद्दलही आपली भूमिका मांडली आहे. (Ankita Lokhande speak about breakup for the first time why did breakup happen with Sushant)
अंकिता म्हणाली की, तिने सुशांतसोबत ब्रेकअप केलं नव्हतं, तर सुशांतनेच तिला सोडलं होतं. अंकिता पुढे म्हणाली की, ती याबाबत आतापर्यंत काहीच बोलली नाही. याचा तमाशा करायचा नसल्याने तिने आतापर्यंत काही खुलासा केला नव्हता, असंही ती म्हणाली. अंकिता पुढे म्हणाली की, ती यासाठी सुशांतला ब्लेम करीत नाही. मात्र ट्रोलिंगमुळे ती खूप त्रस्त झाली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
हे ही वाचा-सुशांतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! Chhichhore ने पटकावला मानाचा पुरस्कार
बॉलीवूड बबलशी बोलताना अंकिता म्हणाली की, अनेकजण मला सुशांतसोबत ब्रेकअप केल्याबद्दल दूषणं देतात. मात्र असं नव्हतं. सुशांत आपल्या निवडीबाबत खूप स्पष्ट होता. तो आपल्या करिअरसोबत पुढे जाऊ इच्छित होता. त्याने आपलं करिअर निवडलं आणि तो निघून गेला. (Ankita Lokhande speak about breakup for the first time why did breakup happen with Sushant) मात्र पुढील दोन ते अडीच वर्षे माझ्यासाठी खूप त्रासदायक होती. माझ्यासाठी यातून बाहेर पडणं अवघड होतं. मात्र माझं कुटुंब कायम माझ्या पाठीशी उभं राहिलं. मात्र सुशांतला खूप मोकळेपणाने नात्यातून जाण्यासाठी सांगितलं होतं, मात्र आतत्या आत मी तुटत चालले होते, असेही अंकिताने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.