सुशांतच्या मृत्यूनंतर महिनाभराने अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर पहिली पोस्ट

सुशांतच्या मृत्यूनंतर महिनाभराने अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर पहिली पोस्ट

सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जाऊन आज एक महिना पूर्ण झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने पहिल्यांदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जुलै : सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जाऊन आज एक महिना पूर्ण झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने पहिल्यांदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने देवासमोर लावलेल्या एका दिव्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने 'Child of God' असे कॅप्शन दिले आहे. अंकिताच्या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. तिला खंबीर राहण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे. 'तो कायम तुझ्याबरोबर आहे', अशा कमेंटही काही युजर्सनी केल्या आहेत.

View this post on Instagram

CHILD Of GOD 😇

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड, टेलिव्हिजन विश्व हादरले होते. त्याची एक्स-गर्लफ्रेंड असणारी अंकिता देखील याकाळात पूर्णपणे कोलमडून गेली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर तिने त्याच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली होती. तिने गेल्या महिनाभरात कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सुशांत आणि अंकिता दीर्घ काळासाठी रिलेशनशीपमध्ये होते. त्यांच्या ब्रेकअपमुळे अनेकांना धक्का बसला होता. पवित्र रिश्तामधील त्यांची केमिस्ट्री आजही अनेकांची आवडती आहे.

(हे वाचा-सारा अली खानचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह, घरातील सदस्यांचे हे आहेत रिपोर्ट)

2009 साली पवित्रा रिश्ता या मालिकेत सुशांत आणि अर्चना एकत्र आले. मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. पण प्रत्यक्ष आयुष्यातही ही जोडी लोकांच्या पसंतीस उतरली. यानंतर अंकिता आणि सुशांत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास सहा वर्षे ते एकत्र होते. मात्र नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशात-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांनाही ते आवडलं नव्हतं.

(हे वाचा-धक्कादायक! तब्बल 5 दिवसांनी सापडला अभिनेत्रीचा मृतदेह, तलावात झाली होती बेपत्ता)

सुशांतसह नातं तुटल्यानंतर अंकिता बिझनेसमन विकी जैनसह रिलेशनशिपमध्ये आली. गेल्या महिनाभरापासून अंकिता सोशल मीडियापासून दूरच होती. सुशांतच्या आत्महत्येच्या दुसऱ्या दिवशी ती सुशांतच्या मुंबईतील घरी त्याच्या कुटुंबाला भेटायला गेली तेव्हा ती शेवटची दिसली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 14, 2020, 10:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading