अंकिता-सुशांतचं 'अमर रिश्ता'! Unseen Photo ला चाहत्यांनी दिली अशी उपमा

अंकिता-सुशांतचं 'अमर रिश्ता'! Unseen Photo ला चाहत्यांनी दिली अशी उपमा

अंकिता लोखंडेने चाहत्यांसोबत लाईव्ह चॅट सेशन केलं. या चॅटमध्ये तिला सुशांतबद्दलच अनेक गोष्टी विचारण्यात आल्या. त्यावर अंकितानेही त्यांच्या आठवणीतील काही Unseen फोटो शेअर केले.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी : कलाविश्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची जोडी आजही अनेक चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सुशांत सिंह राजपूत आता या जगात नसला तरी, त्याच्या अनेक आठवणी, फोटो, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतंच अंकिता लोखंडेने चाहत्यांसोबत लाईव्ह चॅट सेशन केलं. या चॅटमध्ये तिला सुशांतबद्दलच अनेक गोष्टी विचारण्यात आल्या. त्यावर अंकितानेही त्यांच्या आठवणीतील काही Unseen फोटो शेअर केले.

या चॅटदरम्याने अंकिताने एक फोटो जुना फोटो शेअर केला. हा फोटो एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटावेळी सेटवरून सुशांतने केलेल्या व्हिडीओ कॉलचा फोटो आहे. हिरव्या रंगाचा शर्ट, बॅकपॅक आणि चेहऱ्यावर स्मित हास्य असलेला सुशांतचा व्हिडीओ कॉल करतानाचा फोटो अंकिताने शेअर केला आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

(वाचा - सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे गुपचूप करतेय लग्न? PHOTO VIRAL)

तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अंकिता सुशांतचे वडिल केके सिंह, बहिण मितू, प्रियंका आणि श्वेता यांच्यासोबत दिसतेय. हा फोटो शेअर करत तिने, सहा वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये असताना ती एकदा पटणाला गेली असल्याचं सांगितलं.

सुशांतच्या निधनानंतर त्याच्या वडिलांनी, सुशांतच्या आयुष्यातील अशी एकमेव महिला अंकिता होती जिच्याशी ते बोलले असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ती त्यांच्या रिलेशनशिपनंतरही सुशांतच्या कुटुंबियांशी संपर्कात होती. अंकिताने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती आणि सुशांत एका फॅमिली फंक्शनमध्ये नाचताना दिसत आहेत.

लाईव्ह चॅटवेळी अंकिता लोखंडेने शेअर केलेले त्यांचे Unseen Photo पाहून सुशांतबद्दल तिचं असलेलं प्रेम, त्याच्या आठवणींनी अनेक चाहत्यांनी त्या दोघांचं प्रेम पवित्र रिश्ता नसून अमर रिश्ता असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: January 27, 2021, 2:23 PM IST

ताज्या बातम्या